फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Kapil Dev choose next white ball captain for Team India : सध्या आयपीएलचा हंगाम सुरु आहे, भारताचे खेळाडू स्पर्धेमध्ये व्यस्त आहेत. त्यानंतर भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पराभवानंतर रोहित शर्माच्या कर्णधार पदावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर पुढचा व्हाईट बॉल कर्णधार कोण असावा याबाबत चर्चा रंगल्या होत्या.
रोहित शर्मानंतर भारताचा पुढचा व्हाईट बॉल कर्णधार कोण असावा या वादावर माजी दिग्गज आपले मत देत आहेत. T२० क्रिकेटमधून २०२४ मध्ये रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केली आहे त्यानंतर सूर्यकुमार यादवकडे T१० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. काही माजी दिग्गज खेळाडूंचा असा विश्वास आहे की सूर्यकुमार किंवा शुभमन गिल हे भारताचे पुढचे पांढऱ्या चेंडूचे कर्णधार असायला पाहिजेत. पण आता कपिल देव यांनी या प्रकरणावर आपले वेगळे मत मांडले आहे. भारताचा पुढचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार कोण असावा या प्रश्नाचे उत्तर माजी भारतीय कर्णधाराने दिले आहे.
माय खेलशी बोलताना, माजी कर्णधाराने आपले मत मांडले आहे. रोहितनंतर हार्दिक पांड्या पांढऱ्या चेंडूचा कर्णधार असावा, असे माजी कर्णधाराने मान्य केले आहे. सध्या सूर्यकुमार यादवला टी-२० संघाचा कर्णधार आहे. सूर्याला कर्णधार बनवण्यापूर्वी हार्दिकला कर्णधार बनवण्याची चर्चा होती. पण नंतर संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवला टी-२० संघाचा कर्णधार बनवले. त्याचबरोबर काही मालिकांमध्ये हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले होते पण त्यानंतर त्याच्याकडे उपकर्णधार पद कडून घेण्यात आले आणि अक्षर पटेलला उपकर्णधार पद दिले होते.
हार्दिक एक चांगला कर्णधार असल्याचे सिद्ध करेल, त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होऊ शकते, असे माजी भारतीय कर्णधाराने कबूल केले आहे. याशिवाय, कपिल देव यांना असेही वाटते की हार्दिकने कसोटी क्रिकेट देखील खेळावे, जेणेकरून भारतासाठी पुढील कर्णधार निवडण्याची समस्या संपेल. कपिल देव म्हणाले, “जर हार्दिक कसोटी क्रिकेट खेळत असता तर आज भारताला वेगवेगळे कर्णधार निवडण्याचे कोणतेही कारण नसते.”
सध्या हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी, कर्णधार म्हणून, हार्दिकने गुजरात टायटन्सला त्यांचे पहिले आयपीएल जेतेपद मिळवून दिले होते.
हार्दिकचा आयपीएलमधील नेतृत्व प्रवास चढ-उतारांनी भरलेला आहे. या अष्टपैलू खेळाडूने २०२२ मध्ये गुजरात टायटन्ससाठी कर्णधार म्हणून पहिल्या हंगामात विजेतेपद जिंकले आणि पुढच्या वर्षी त्यांना आणखी एका अंतिम फेरीत नेले. तथापि, २०२४ च्या लिलावापूर्वी एमआयने हार्दिकला त्यांच्या संघात परत आणले आणि त्याला संघाचा नवीन कर्णधार बनवले. रोहितच्या जागी हार्दिकला कर्णधार बनवल्यानंतर चाहते खूप आश्चर्यचकित झाले आणि याबद्दल बरेच वाद झाले परंतु हार्दिकने आपल्या खेळाने पुन्हा चाहत्यांची मने जिंकली. आता हार्दिक मुंबई इंडियन्सचा कायमचा कर्णधार बनला आहे.