फोटो सौजन्य - PTI सोशल मीडिया
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ टीम इंडिया : चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यावेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करत आहे. त्याच वेळी, या स्पर्धेपूर्वी, टीम इंडिया इंग्लंडसोबत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून भारतीय संघ १-० ने पुढे आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा खराब कामगिरी करताना दिसला. आता रोहितच्या खराब फॉर्ममुळे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाचा ताण वाढला आहे.
याआधी भारताच्या संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा त्याचबरोबर विराट कोहलीने देखील संपूर्ण मालिकेमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताच्या संघाने मालिका गमावली. शेवटच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये खराब फॉर्ममुळे रोहित शर्मा स्वतः संघाबाहेर होता. आता माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांनी रोहित शर्माला त्याच्या खराब कामगिरीबद्दल इशारा दिला आहे.
India vs England : कधी आणि कुठे पाहता येणार भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना? वाचा सविस्तर
टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी क्रिकेट अड्डा यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, “टी-२० विश्वचषक जिंकून संघ परतला तेव्हा असे विलक्षण दृश्य दिसले जे मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. जेव्हा हे खेळाडू खराब कामगिरी करतात तेव्हा त्यांना खूप टीकेचा सामना करावा लागतो, म्हणून मी म्हणतो, एखाद्याची इतकी प्रशंसा करू नका की ते नंतर ते सहन करू शकणार नाहीत.”
कपिल देव पुढे म्हणाले, “रोहित हा एक मोठा खेळाडू आहे आणि तो लवकरच फॉर्ममध्ये परतेल. जेव्हा कर्णधाराचा फॉर्म खराब असतो तेव्हा संपूर्ण संघ अडचणीत सापडतो. आता संपूर्ण देश संघाच्या चांगल्या कामगिरीची वाट पाहत आहे.”
रोहित शर्मा लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये सतत खराब फॉर्ममधून जात आहे. तथापि, फॉर्ममध्ये परत येण्यासाठी, रोहितने रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले परंतु हिटमॅन तिथेही अपयशी ठरला. यानंतर, चाहत्यांना अशी अपेक्षा होती की रोहित पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये चमत्कार करेल, परंतु पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित फक्त २ धावा काढून बाद झाला.
“He (Rohit) is a big player. I hope he returns to form quickly. I will say good luck to the coach. It takes time to settle in. The team looks unsettled. When the captain’s form is poor, the team has problems,” @therealkapildev said.#CT25 #TeamIndia https://t.co/fIm8joJVgV
— Circle of Cricket (@circleofcricket) February 8, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील दुसरा सामना ९ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. तर तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. या दोन्ही सामन्यानंतर भारताचा संघ युएईला चॅम्पियन ट्रॉफीसाठी रवाना होणार आहे. भारताचा संघ सर्व चॅम्पियन ट्रॉफीचे सामने युएईला खेळणार आहे.