फोटो सौजन्य - सोशल मीडिया
कोच गैरी कर्स्टन-केविन पीटरसन : पाकिस्तान वनडे आणि T20 संघाचे कोच गैरी कर्स्टन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 56 वर्षीय कर्स्टन यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी (PCB) मतभेदांमुळे हा निर्णय घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यावर्षी एप्रिलमध्ये त्यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध सहा महिन्यांतच तुटले. कर्स्टनच्या या निर्णयाने इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनला बाणाप्रमाणे टोचले आहे. कर्स्टन यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी पाकिस्तान क्रिकेटला घेरले. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज कर्स्टन 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.
पीटरसनने सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’अकाउंटवर लिहिले की, पाकिस्तान क्रिकेट प्रशिक्षक म्हणून गॅरी कर्स्टन कसे गमावू शकते? गेल्या काही आठवड्यात एक पाऊल पुढे टाकल्यानंतर आज आम्ही दोन पावले मागे आलो. हे स्वतःशी करणे थांबवा. असे काम करत राहण्यासाठी खूप प्रतिभा लागते. माजी क्रिकेट खेळाडू पीटरसनच्या या पोस्टवर क्रिकेट चाहत्यांकडून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटले की, पाकिस्तानला कोचिंग देणे म्हणजे सर्कसमध्ये काम करण्यासारखे आहे. परदेशी प्रशिक्षकांबद्दल खूप आदर आहे, कारण राजकारण आणि अतिरिक्त गोंगाट हे सोपे काम नाही.
How can Pakistan Cricket lose Gary Kirsten’s with his resumè in coaching?
One step forward the last few weeks and two steps back today!
Stop doing it to yourselves. Too much talent to keep doing this kind of stuff!— Kevin Pietersen🦏 (@KP24) October 28, 2024
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गॅरी कर्स्टन यांच्या अचानक राजीनाम्याचे कोणतेही कारण अजुनपर्यत स्पष्ट झाले नाही. त्याचवेळी, अहवालानुसार, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची निवड करताना आणि नवीन कर्णधाराची नियुक्ती करताना त्यांचे मत घेतले गेले नाही याबद्दल कर्स्टन नाराज होते. अनेक वृत्तांच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, पीसीबीने संघ निवडीशी संबंधित त्याचे अधिकार काढून घेतले आले, जे मतभेदांचे आणि राजीनाम्याचे मुख्य कारण मानले जात आहे. संघ निवडणे हे आता केवळ निवड समितीचे कार्यक्षेत्र आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विकेटकिपर मोहम्मद रिझवानची पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले होते.
पाकिस्तानच्या मर्यादित षटकांच्या संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तितके T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. ही मालिका 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर 24 नोव्हेंबरपासून पाकिस्तानला झिम्बाब्वेमध्ये तीन वनडे आणि तीन T20 सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी मर्यादित षटकांच्या संघाची जबाबदारी सांभाळणार आहेत. सूत्राने सांगितले की, “गिलेस्पीने बोर्डाला कळवले आहे की त्यांना झिम्बाब्वे आणि त्यापुढील मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी दुसरा प्रशिक्षक नियुक्त करावा लागेल.”