भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ ला कधीकाळी भविष्यातील सचिन तेंडुलकर बोलले जायचे. तो भविष्यात नक्कीच देशासाठी क्रिकेट खेळात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा पृथ्वीला होती. मात्र याच पृथ्वीला सध्या भारतीय संघामध्ये संधी मिळणं देखील अवघड झालं आहे. पृथ्वी शॉ 2021 पासून भारतीय संघाबाहेर आहे आणि जवळपास दीड वर्षानंतरही तो संघात पुनरागमन करू शकलेला नाही. शातच आता नुकत्याच जाहीर झालेल्या श्रीलंका विरुद्ध (IND vs SL) देखील त्याला संधी देण्यात आली नाही. कदाचित यामुळे नाराज होऊन पृथ्वीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याला एक कॅप्शन दिला आहे.
Look at the prithvi shaw insta story#INDvSL pic.twitter.com/Xq6NGvgJcG
— memes_hallabol (@memes_hallabol) December 28, 2022
पृथ्वी शॉला २०२३ च्या सुरुवातीला होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळेल अशी शक्यता होती. मात्र, सिलेक्टर्सने पृथ्वीवर विश्वास दाखवला नाही. मागील काळ खराब फॉरमधून जात असलेल्या पृथ्वीने जोरदार कमबॅक केलं होतं. मात्र, अपेक्षा भंग झाल्याने पृथ्वी शॉ नाराज असल्याचं दिसतंय. पृथ्वी शॉ याने त्याच्या इन्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये त्याने शायरी देखील लिहिली होती. पृथ्वीच्या या स्टोरीवरून अनेक वेगळवेगळे अर्थ काढले जात आहेत. तसेच पृथ्वीने त्याचा इन्टाग्राम अकाऊंटचा डीपी देखील हटवला आहे.
दरम्यान, इंस्टाग्राम स्टोरीवर पृथ्वीने एक रिल शेअर केला होता. उझैर हिजाजी यांची शायरी पृथ्वीने शेअर केली. ‘किसीने मुफ्त में पा लिया वो शख्स… जो मुझे हर कीमत पर चाहिते था’, असं या स्टोरीमध्ये म्हटलं गेलंय. त्यावर कमेंट करताना शॉने ‘क्या बात…’, असं म्हणलंय. त्याची ही पोस्ट पाहून पृथ्वी शॉला नेमकं काय म्हणायचंय?, असा सवाल क्रिडाविश्वात उपस्थित केला जातोय.