फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
KKR vs PBKS match cancelled due to rain : ईडन गार्डन्सवर चालू असलेला कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये सुरू असलेला सामना रोखण्यात आला. मैदानावर अचानक हवा जोरदार सुरु झाली त्याचबरोबर लगेचच मैदानामधील खेळाडूंनी मैदान सोडले आणि सर्व खेळाडू मैदानाबाहेर गेले. एवढेच नव्हे तर लगेचच मैदानावरील सपोर्ट स्टाफने मैदानावर कव्हर लावले. जेव्हा हवामान खराब झाले होते तेव्हा पहिला डाव संपला होता आणि दुसरा डाव सुरू झाला होता यावेळी सुनील नारायण आणि गुरबाज हे दोघे केकेआरचे सलामीवीर फलंदाज फलंदाजी करत होते.
सामना सुरू असतानाच पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि दुसरी ओव्हर सुरू होती अचानक जोरात हवा सुरू झाली आणि सामना थांबवण्यात आला. काही वेळ आधी सांगण्यात येत होते की सामना सुरू होणार आहे पण कोलकत्तामध्ये मुसळधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही संघांना हा सामना रद्द झाल्यामुळे 1-1 गुण देण्यात आले आहेत.
Match 4⃣4⃣ between @KKRiders and @PunjabKingsIPL has been called off due to rain 🌧️
Both teams share a point each! #TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/mEX2eETWgh
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2025
२०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने पहिल्याच षटकात ७ धावा केल्या. पण यानंतर पाऊस सुरू झाला, ज्यामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. नंतर पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना १-१ गुण मिळाले. रहमानउल्लाह गुरबाज १ आणि सुनील नरेन ४ धावांवर नाबाद राहिले. पंजाब किंग्जच्या सलामीवीरांसमोर केकेआरचा गोलंदाजी विभाग कोसळला. जवळजवळ सर्वच गोलंदाज पंजाबला पहिला धक्का वेळेवर देऊ शकले नाहीत. वैभव अरोरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ३४ धावा देऊन २ फलंदाजांचे बळी घेतले. तर वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांना १-१ यश मिळाले.
कोणी दिली Gautam Gambhir यांना धमकी? दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आरोपी, केली अटक
आजच्या सामन्यात प्रभासिमरन आणि प्रियांश आर्य यांनी धुवाधार खेळी खेळली. दोघांनी १२० धावांची भागीदारी करत शानदार सुरुवात केली. प्रियांशने ३५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ६९ धावा केल्या, तर प्रभसिमरन सिंगने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ८३ धावा केल्या. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरनेही १६ चेंडूत २५ धावा केल्या. मात्र, यानंतर पंजाबचा कोणताही फलंदाज मोठी खेळी खेळू शकला नाही. पंजाबने २० षटकांत ४ गडी गमावून २०१ धावा केल्या होत्या. केकेआरच्या गोलंदाजीचे सांगायचे झाले तर आंद्रे रसेल याने संघासाठी १ विकेट घेतला. तर वरुण चक्रवर्ती याने देखील संघासाठी एक विकेटची कमाई केली. वैभव अरोडा याने २ विकेट घेतले पण त्याला भरपूर धाव ठोकल्या.