फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad सोशल मीडिया
Sunrisers Hyderabad playing 11: आयपीएल २०२५ मधील कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील १५ वा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत काही खास राहिलेली नाही. दोन्ही संघांनी आतापर्यंत ३-३ सामने खेळले आहेत, त्यापैकी २ सामने त्यांनी गमावले आहेत आणि १-१ सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट राइडर्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता तर हैदराबादच्या संघाने पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत करून दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सने पराभूत केले.
गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सना मुंबई इंडियन्सकडून आणि सनरायझर्स हैदराबादला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव स्वीकारावा लागला. सनरायझर्सना त्यांच्या शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे आता कर्णधार पॅट कमिन्स प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. ईडन गार्डन्सची फिरकी अनुकूल खेळपट्टी लक्षात घेता कमिन्स हा निर्णय घेऊ शकतात.
KKR vs SRH : आज ईडन गार्डन्सची खेळपट्टी स्थिती कशी असणार? कोणाला होणार फायदा? वाचा सविस्तर
फिरकी गोलंदाज राहुल चहरला आयपीएल २०२५ मध्ये अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. सध्या, सनरायझर्सकडून अॅडम झांपा आणि झीशान अन्सारी हे २ फिरकी गोलंदाज खेळताना दिसले आहेत. याशिवाय अभिषेक शर्माने अर्धवेळ गोलंदाजी देखील केली आहे. आता राहुल चहरचा सनरायझर्स हैदराबाद केकेआर विरुद्ध खेळू शकतो. राहुलने आतापर्यंत ७८ सामन्यांमध्ये ७५ विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये अॅडम झांपा खेळताना दिसला पण तो फारसा प्रभावी ठरला नाही. झम्पाला २ सामन्यात फक्त २ विकेट घेता आल्या. यानंतर, तिसऱ्या सामन्यात वियान मुल्डरला संधी मिळाली, ज्याची कामगिरीही फारशी खास नव्हती. व्यानला फक्त १ षटक टाकण्याची संधी मिळाली ज्यामध्ये त्याने १६ धावा दिल्या.
Never say never ft. Rahul 😂🧡
Rahul Chahar | #PlayWithFire | #TATAIPL2025 pic.twitter.com/39KEmGULkz
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 1, 2025
सनरायझर्स हैदराबादचा संघ कागदावर मजबूत दिसत होता, त्याचबरोबर पहिल्या सामान्यमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात हैदराबादच्या संघाने मोठी धावसंख्या उभारली होती. पण त्यानंतर संघाला सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, मोहम्मद शमी, राहुल चहर, जीशान अन्सारी.