फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया
अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामान्यांच्या पहिला टप्पा झाला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये इंग्लंडचा पराभव केला होता तर अफगाणिस्तानच्या संघाला पहिल्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दमदार कमबॅक करत इंग्लंडला पराभूत करून सेमीफायनलच्या शर्यतीमध्ये टिकून आहेत. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे.
आतापर्यंत, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे दोन सामने लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळले गेले आहेत आणि दोन्ही सामने हाय स्कोअरिंग राहिले आहेत. चारही डावांमध्ये संघांनी ३०० धावांचा टप्पा ओलांडला आहे आणि येथे फलंदाज गोलंदाजांवर वर्चस्व गाजवतील अशी अपेक्षा आहे. मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकेल तर वेगवान गोलंदाज नवीन चेंडूचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. एकंदरीत, या मैदानाची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे गोलंदाजीत कमी धावा देणारा संघ जिंकेल.
Both teams unchanged for the big game!
Live coverage: https://t.co/z1ioTCokXt #AFGvAUS #ChampionsTrophy pic.twitter.com/rubGaRzRUF
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 28, 2025
स्पर्धेतील हा सामना खूप रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. कारण अफगाणिस्तानने गेल्या सामन्यात इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला हरवले आहे आणि आता त्यांचे लक्ष ऑस्ट्रेलियाला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यावर असेल. ऑस्ट्रेलियन संघ दुसरा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करू इच्छितो. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला हरवले. स्पर्धेत, अफगाणिस्तान संघ दोन सामन्यांतून दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया संघाचे दोन सामन्यांतून तीन गुण आहेत आणि ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
दोन्ही संघासाठी आजचा सामना करो या मरो असा असणार आहे, गणित फार सोपे आहे आज जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ असणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे.
मॅट शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), ऍलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुईस, नॅथन एलिस, ऍडम झॅम्पा, स्पेन्सर जॉन्सन
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झद्रान, राहमत शाह, सेदीकुल्ला अटल, अजमतुल्ला उमरझाई, गुलाबदिन नाईब, मोहम्मद नबी, रशीद खान, फजलहक फारुकी, नूर अहमद