Lakshya Sen : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू मोठ्या अडचणीत; कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश; जाणून घ्या प्रकरण
Lakshya Sen : जागतिक अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला अभिमान वाटावा असा प्रसिद्ध बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन मोठ्या अडचणीत सापडला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने लक्ष्य सेन यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत. लक्ष्य सेनवर वयाच्या फसवणुकीचा आरोप आहे. लक्ष्य सेनने ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले वय खोटे दाखवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात त्याचे कुटुंबीय आणि प्रशिक्षकही सहभागी आहेत. त्याच्या आईवडिलांनी आणि भावाने मिळून त्याचा जन्म दाखला बदलल्याचा आरोप आहे. आता कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
लक्ष्य सेन बाबतीत कर्नाटक उच्च न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश
🚨 Lakshya Sen & Family Under Investigation 🚨🏸
The Karnataka High Court has allowed the probe to continue against Lakshya Sen, Chirag Sen, their parents & coach U. Vimal Kumar over age fabrication allegations. ⚖️
🔍 Key Developments:
▪️ Court finds prima facie evidence to… pic.twitter.com/8dMkLlbmrE— Doordarshan Sports (@ddsportschannel) February 25, 2025
उच्च न्यायालयात सादर केलेले ठोस पुरावे
कर्नाटक उच्च न्यायालयात लक्ष्य सेन यांच्याविरुद्ध वयाच्या वादाशी संबंधित याचिका फेटाळण्याची मागणी करण्यात आली होती परंतु न्यायाधीश एमजी उमा यांनी त्या याचिका फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, जर प्रथमदर्शनी गुन्ह्याकडे लक्ष वेधणारी सामग्री रेकॉर्डवर ठेवली गेली असेल, तर मला तपास थांबवण्याचे किंवा फौजदारी कारवाईची सुरुवात रद्द करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. न्यायालयाने म्हटले आहे की तक्रारदाराने न्यायालयासमोर बरीच सामग्री सादर केली आहे, ज्यामध्ये माहिती अधिकार कायद्यांतर्गत संबंधित अधिकाऱ्याकडून मिळालेल्या कागदपत्रांचाही समावेश आहे.
काय आहे लक्ष्य सेन प्रकरण
लक्ष्य सेन विरुद्धच्या तक्रारीत असा आरोप आहे की लक्ष्य सेन आणि त्याच्या भावांचे वय बनावट होते जेणेकरून ते २०१० पासून बॅडमिंटन स्पर्धांच्या ज्युनियर श्रेणींमध्ये खेळू शकतील. लक्ष्य सेनचे वय अडीच वर्षांनी कमी करण्यासाठी जन्म प्रमाणपत्रात छेडछाड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. युवा व्यवहार मंत्रालयाच्या चौकशीत त्याच्या वडिलांना रेकॉर्डमध्ये छेडछाड केल्याबद्दल दोषी आढळल्याचा दावा केला जात आहे. आता हे संपूर्ण प्रकरण उच्च न्यायालयासमोर आहे, आता तपासातून काय निष्पन्न होते ते पाहायचे आहे.
लक्ष्य सेनची कारकीर्द
लक्ष्य सेन सध्या २३ वर्षांचा आहे. त्याचे प्रशिक्षक विमल कुमार आणि प्रकाश पदुकोण आहेत. या खेळाडूने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये देशासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत. लक्ष्यने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली. त्याने थॉमस कपमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे. याशिवाय त्याने आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. युवा ऑलिंपिक स्पर्धेतही त्याच्या नावावर सुवर्णपदक आहे.