फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
LSG vs DC : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामान्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी बाजी मारली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आजच्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना लखनौच्या होमग्राउंडवर इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामान्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये लखनौच्या संघाने फलंदाजी करत दिल्लीसमोर 160 धावांचे लक्ष उभे केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडे आज १२ गुण जिंकण्याची संधी आहे.
आजच्या सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजीचे सांगायचे झाले तर संघाचे सलामीवीर फलंदाज इडन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी दमदार सुरुवात करून दिली. इडन मार्करम याने संघासाठी आणखी एक अर्धशतक झळकावले. मार्करम याने संघासाठी ३३ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या. यामध्ये ३ षटकार आणि २ चौकार मारले. मिचेल मार्श याने संघासाठी आणखी एकदा चांगली खेळी खेळली. मार्शने संघासाठी ३६ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या. यामध्ये त्याने १ षटकार ३ चौकार मारले. निकोलस पुरण याने संघासाठी आज मोठी कामगिरी करू शकला नाही. आज त्याने ५ चेंडू खेळले आणि ९ धावा केल्या.
Innings Break!
Excellent comeback from the #DC pacers helps them restrict #LSG to 1️⃣5️⃣9️⃣
Who’s taking away 2️⃣ important points tonight?
Updates ▶️ https://t.co/nqIO9mb8Bs#TATAIPL | #LSGvDC | @LucknowIPL | @DelhiCapitals pic.twitter.com/MVY74cXm8I
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2025
अब्दुल समद याला चौथ्या नंबरवर फलंदाजीसाठी आला होता पण तो विशेष कामगिरी करू शकला. डेव्हिड मिलर आज लवकर फलंदाजीसाठी आला होता. पण तो विशेष कामगिरी करू शकला नाही १५ चेंडूंमध्ये १४ धावा केल्या. आयुष बडोनी हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीसाठी आला होता. यावेळी त्याने २१ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार मारले. रिषभ पंत शेवटच्या दोन चेंडू शिल्लक असताना फलंदाजीला आला होता पण तो इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला.
IPL 2025 दरम्यान ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूसाठी वाईट बातमी, होणार चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर मिचेल स्टार्क याने संघासाठी १ विकेट घेतला. यामध्ये त्याने निकोलस पुरणला बाहेरचा रस्ता दाखवला. दुष्मंथा चामीराला आज आयपीएल २०२५ मध्ये संघामध्ये स्थान मिळाले आज त्याने सामन्यांमध्ये १ विकेट घेतला. मुकेश कुमारने संघासाठी धुव्वादार गोलंदाजी केली आज त्याने संघासाठी ४ विकेट घेतले. मुकेश कुमारने आज मिचेल स्टार्क, अब्दुल समद, आयुष बडोनी आणि रिषभ पंत यांना बाहेरचा रस्ता दाखवला.