विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्राचा मेघालयावर दणदणीत विजय, अवघ्या 20 षटकांमध्येच गाठले लक्ष्य
Maharashtra’s resounding Victory Over Meghalaya : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात आज महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी अक्षरश: मेघालचा धुव्वा उडवला. शेवटची फळी कापून काढत अवघ्या 113 धावांवर मेघालयचा ऑलआऊट केला. शेवटचे तीन फलंदाज शून्यावर बाद झाले. यामध्ये वीरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्र संघाची विजयी घौडदौड सुरूच आहे. महाराष्ट्राच्या संघाने धमाकेदार खेळी करीत मेघालयवर शानदार विजय प्राप्त केला. मेघालयचा प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 113 धावांवरच ऑलआऊट झाला. यानंतर महाराष्ट्र संघाने अवघ्या 20 षटकांमध्येच आपले टार्गेट पूर्ण केले.
मेघालयचा डाव घसरला
महाराष्ट्र संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर मेघालयचा डाव अक्षरश: कोसळला. अर्पित सुभाष वगळता एकाही फलंदाजाला 30चा आकडा पार करता आला नाही. महाराष्ट्रकडून एस ए वीरने सर्वाधिक विकेट घेतल्या. वीरने 3, तर हंगरेकरने 1, गुर्बानीने 2, बच्छावने 2, दधेने 1 विकेट घेतली.
महाराष्ट्र संघाच्या सलामी जोडीने गाठले लक्ष्य
महाराष्ट्र संघासमोर 114 धावांचे लक्ष्य असताना सलामीवीर ओम भोसले आणि वीरनेच सामना विजयापर्यंत नेला. एस ए वीरचे शानदार अर्धशतक आणि भोसलेल्या 46 धावांच्या जोरावर महाराष्ट्र विजयापर्यंत पोहचला. त्रिपाठीने नाबाद 7 धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला.
विजय हजारे ट्रॉफीचा फॉरमॅट
स्पर्धेसाठी ३८ संघांची ५ गटात विभागणी करण्यात आली आहे. अ, ब आणि क गटात प्रत्येकी ८ संघ आहेत, तर ड आणि ई गटात प्रत्येकी ७ संघ सहभागी आहेत. ५ गटातील दोन संघ बाद फेरीत पोहोचतील. तर दुसऱ्या क्रमांकावरील संघांना संघ ६ ते १० पर्यंत क्रमवारी दिली जाईल.
विजय हजारे ट्रॉफी गट
अ गट: हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, ओडिशा, झारखंड, गोवा, आसाम, मणिपूर.
ब गट: राजस्थान, महाराष्ट्र, सेवा, रेल्वे, हिमाचल प्रदेश, आंध्र, मेघालय, सिक्कीम.
क गट: कर्नाटक, मुंबई, हैदराबाद, सौराष्ट्र, पंजाब, पाँडेचेरी, अरुणाचल प्रदेश, नागालँड.
गट ड: तामिळनाडू, विदर्भ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, मिझोराम.
गट ई: बंगाल, केरळ, त्रिपुरा, मध्य प्रदेश, दिल्ली, बडोदा, बिहार.
विजय हजारे ट्रॉफी- बाद फेरीचे वेळापत्रक
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचा बाद फेरीचे सामने ९ जानेवारी २०२५ रोजी सुरू होतील. फायनल १९ जानेवारीला होणार आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ हंगामातील सर्व बाद सामने वडोदरा येथे होणार आहेत
हेही वाचा :