फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Lucknow Super Giants vs Mumbai Indians match toss update : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना सुरु झाला आहे. या सामन्यांमध्ये रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या आमनेसामने असणार आहेत. हा सामना लखनौच्या होमग्राउंड एकना क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यावर चाहत्यांची नजर असणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिले दोन सामने गमावले आहेत. यामध्ये त्यांना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पहिला पराभवाचा सामना करावा लागला होता तर दुसऱ्या सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. तर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला आतापर्यत दोन पराभवाना सामोरे जावे लागले आहे. लखनऊच्या संघाला पहिल्या सामन्यांमध्ये त्यांना दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे तर दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करून दोन गुण मिळवले होते. तर झालेला शेवटचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध झाला होता यामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
🚨 Toss 🚨
Mumbai Indians won the toss and opted to bowl first against Lucknow Super Giants.
Updates ▶️ https://t.co/HHS1Gsaw71#TATAIPL | #LSGvMI | @LucknowIPL | @mipaltan pic.twitter.com/sMnXPV2Xnx
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2025
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार मुंबईचा स्टार खेळाडू रोहित शर्मा या सामन्यात खेळताना दिसत नाही. हार्दिक पांड्याने नाणेफेकीदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे उघड केले. यामुळे तो या सामन्यात खेळत नाहीये. या आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या जागेवर राज बावा याला संघाकडे स्थान मिळाले आहे.
लखनौ सुपर जायंट्सच्या संघामध्ये आज एक बदल करण्यात आला आहे, यामध्ये आकाशदीपचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे. सिद्धार्थच्या जागेवर आकाशदीपला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळाले आहे.
एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकिपर), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, दिग्वेश राठी, आकाशदीप
विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, अश्विनी कुमार, दीपक चहर, विघ्नेश पुथूर