फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
First innings of Lucknow Super Giants vs Mumbai Indians match : शुक्रवारी आयपीएल सामन्यात, मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सूर्यकुमार यादव त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १०० वा सामना खेळत आहे. दरम्यान, मुंबईचा सलामीवीर रोहित शर्मा नेट प्रॅक्टिस दरम्यान जखमी झाला, त्यामुळे तो आजचा सामना खेळत नाही. आकाशदीप सिंग लखनऊ सुपर जायंट्स संघात परतला आहे. दुखापतीमुळे तो गेल्या काही सामन्यांमधून बाहेर होता. या सामन्यात त्याला एम सिद्धार्थच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आले आहे. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने खळबळ उडवून दिली आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या लखनौकडून मिचेल मार्शने शानदार फलंदाजी केली. त्याने फक्त २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. याशिवाय त्याने ३१ चेंडूत ६० धावांची खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राईक रेट १९३.५५ होता. तो लखनौसाठी पॉवरप्लेमध्ये अर्धशतक करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. काइल मेयर्सने त्याच्या आधी हा पराक्रम केला आहे. २०२३ च्या आयपीएल हंगामात त्याने पॉवरप्लेमध्ये दोनदा अर्धशतके केली. त्याने मार्करामसोबत पहिल्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारीही केली.
Innings Break!#LSG set a target of 2️⃣0️⃣4️⃣ courtesy of half-centuries from Mitchell Marsh and Aiden Markram!
Will #MI register a consecutive win in #TATAIPL 2025?#LSGvMI pic.twitter.com/JrAG5JK1vn
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2025
लखनऊ सुपर जायंट्सच्या फलंदाजी बद्दल बोलायचं झाले तर यामध्ये संघासाठी मिचेल मार्शने तर धमाकेदार फलंदाजी केली पण त्याच्यासोबत ईडन मार्करमने देखील दमदार खेळ दाखवला. आयुष बडोनीने संघासाठी १९ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या. निकोलस पुरण या सामन्यात संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही त्याने ६ चेंडूंमध्ये १२ धावा करून हार्दिक पांड्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. तर लखनऊ चा कर्णधार ऋषभ आणखी एकदा फेल ठरला आणि तो दोन धावा करून बाद झाला.
LSG VS MI : सामन्याआधी रोहित शर्मा आणि झहीर खानमधील संभाषण लीक, ‘जब करना था मैंने किया…’ Video Viral
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना सुरुवातीला चांगलेच धुतले त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने संघासाठी ५ विकेट्स मिळवले आहेत. यामध्ये हार्दिक पंड्याने ईडन मार्करम, रिषभ पंत, डेव्हिड मिलर, आकाशदीप आणि निकोलस पुरण यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.