ms dhoni
IPL 2026: दिल्लीचा दणदणीत विजय पण अक्षर पटेलवर BCCI ची कारवाई; नेमकं कारण काय?
पोटरीच्या दुखापतीमुळे एम.एस. धोनी या आयपीएल २०२६ च्या संपूर्ण हंगामात मैदानाबाहेर होता. दुखापतीची तीव्रता पाहता, तो यावर्षी संघासोबत फार कमी प्रवास करू शकला आहे. आतापर्यंत तो फक्त हैदराबाद(SRH) आणि मुंबईविरुद्धच्या (MI) सामन्यांमध्येच संघासोबत दिसला आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी पुष्टी केली आहे की, धोनीचे तिकीट संघातील इतर ६० सदस्यांसह इंडिगोच्या कमर्शियल विमानाने लखनऊला जाण्यासाठी बुक करण्यात आले आहे. अंतिम निर्णय धोनीचा असला तरी, याबातमीने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चेन्नई सुपर किंग्स सध्या गुणतालिकेत (Points Table) पाचव्या स्थानावर असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवांनी केल्यानंतर, पाच वेळच्या या विजेत्या संघाने आपल्या शेवटच्या आठ सामन्यांपैकी सहा सामने जिंकून दमदार कमबॅक केले आहे. संघाच्या या यशामागे संजू सॅमसनची स्फोटक फलंदाजी आणि युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजची भेदक गोलंदाजी कारणीभूत आहे. सीएसकेने(CSK) आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ६ विजय आणि ५ पराभवांसह १२ गुण मिळवले आहेत. प्लेऑफमध्ये (Playoffs) स्थान मिळवण्यासाठी, त्यांना १६ गुणांचा टप्पा गाठावा लागेल. यासाठी उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. लीग टप्प्यातील शेवटच्या तीन सामन्यांपैकी किमान एका सामन्यात धोनी मैदानात उतरेल, अशी चाहत्यांना आशा आहे. चेन्नई सुपर किंग्सचे सामने १५ मे रोजी लखनऊ सुपर जायंट्स, १८ मे रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि २१ मे रोजी गुजरात टायटन्स यांच्याविरुद्ध होणार आहेत.
कॅमेरा सुरू झाला की Virat Kohli बदलतो? भारताच्याच माजी खेळाडूने थेट सांगितले; म्हणाले…






