एमएस धोनीचा व्हिडिओ व्हायरल (फोटो- ट्विटर)
भारत अन् इंग्लंड सामन्यात क्रिकेट स्टेडियमवर देखील एक स्टार उपस्थित होता. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी आणि त्याची मुलगी देखील सामना पाहायला उपस्थित असल्याचे दिसून आले. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. टीम इंडियाचा उत्साह वाढवण्यासाठी थेट एजबेस्टनच्या स्टेडियममध्ये धोनी त्याच्या कुटुंबासह उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा धोनी स्टेडियमध्ये असल्याचे कळले तेव्हा सर्व कॅमेरे त्याच्याकडे वळले होते. तेव्हा धोनी-धोनीच्या घोषणांनी क्रिकेटचे मैदान दुमदुमन उठले.
भारत अन् इंग्लंड दौऱ्यादरम्यान भारताचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर एमएस धोनीसह माजी खेळाडू दिनेश कार्तिक देखील असल्याचे पाहायला मिळाले. याआधी एमएस धोनी टी 20 सिरिजमधील तिसरा सामना देखील पाहायला गेल्याचे समजते आहे. याशिवाय बॉलीवूड कृती सेनन देखील उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
Indian Cricket Team: कर्णधार आणि फॉर्मेट बदलातच जिंकली भारतीय टीम, आता नजर सिरीजच्या विजयावर
काल भारत अन् इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना पार पडला. यामध्ये टॉस जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडने भारताला 259 रन्सचे टार्गेट दिले होते. ते भारताने 4 विकेट्स गमावून पूर्ण केले. भारताकडून अक्षर पटेलने शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी केल्याचे दिसून आले. त्याने 4 विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजीत देखील चांगले प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले.
🐐🐐🐐 Things we love to see – Virat Kohli, MS Dhoni & Rohit Sharma in one frame. ❤️#ENGvIND 1st ODI 👉 Streaming LIVE on JioHotstar! pic.twitter.com/LfHEGN87mT — Star Sports (@StarSportsIndia) July 14, 2026
काल इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला होता. मात्र जो रूटने इंग्लंडचा डाव सावरला गेला. इंग्लंडने 258 ने रन्सपर्यंत मजल मारली. यापूर्वी, २०१४ मध्ये एडजबॅस्टन येथे एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला पराभूत करणारा भारत हा शेवटचा संघ होता. आता, २०२६ मध्ये देखील भारतीय संघाने पुन्हा एकदा इंग्लंडला धूळ चारली.
IND Vs ENG Live: अक्षर ठरला ब्रिटिशांचा कर्दनकाळ! इंग्लंडची पडझड; भारताला विजयासाठी 258 रन्सची गरज
भारतीय संघ: रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर / कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह / मोहम्मद सिराज.
इंग्लंडचा संघ: फिल सॉल्ट, विल जॅक्स, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), बेन डकेट, सॅम करन, लियाम डॉसन / रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद / गस ॲटकिन्सन.






