जसप्रीत बूमराहचा रेकॉर्ड (फोटो- ians)
जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या कर्णधाराला म्हणजेच हॅरी ब्रूकला 1 रन्सवर आउट केले. बुमराहने बॉल टाकल्यावर हॅरी ब्रूकचा कॅच स्लिपमध्ये रोहित शर्माने अलगद पकडला. आज जसप्रीत बूमराहने वनडे क्रिकेटमध्ये 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. हॅरी ब्रूक त्याची 150 वी विकेट्स ठरली. पराभवाची मालिका संपवून विजयी सुरुवात करण्यासाठी भारत पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजचा सामना भारत जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे.
सर्वात कमी बॉल्समध्ये जसप्रीत बूमराहने 150 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. असे करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 4605 बॉलमध्ये हा रेकॉर्ड केला आहे. सर्वात कमी बॉलमध्ये 150 विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मोहम्मद शमीच्या नावावर आहे. शामीने 4070 बॉलमध्ये हा रेकॉर्ड केला.
हॅरी ब्रूकला आउट करताच बूमराह इंग्लंडमध्ये वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. बूमराहने रवींद्र जाडेजाचा रेकॉर्ड मोडला आहे. रवींद्र जाडेजाने इंग्लंडमध्ये 30 विकेट्स घेतल्या होत्या. आता जसप्रीत बूमराहने तो रेकॉर्ड मोडत 31 विकेट्स घेत हा रेकॉर्ड मोडला आहे. पहिल्या स्थानावर जसप्रीत बूमराह, दुसऱ्या स्थानावर रवींद्र जाडेजा तर तिसऱ्या स्थानावर भुवनेश्वर कुमारचा समावेश आहे.
भारतीय संघ: रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर / कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह / मोहम्मद सिराज.
IND Vs ENG Live: मोठा गेम होणार! समोर आली दोन्ही संघांची Playing 11; रोहित अन् विराट थेट….
इंग्लंडचा संघ: फिल सॉल्ट, विल जॅक्स, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), बेन डकेट, सॅम करन, लियाम डॉसन / रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद / गस ॲटकिन्सन.






