मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स : आज कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्ससोबत (Mumabi Indians) त्यांच्या घरच्या मैदानावर भिडणार आहेत. आजचा हा सामना मुंबई मधील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) रंगणार आहे. आजच्या हा आयपीएल 2024 च्या 51 वा सामना होणार आहे. मुंबई इंडिअन्सचा संघ आज हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. आजचा सामना विशेषतः मुंबई इंडियन्ससाठी महत्वाचा असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत 10 सामन्यांमध्ये 3 विजयांसह 9व्या स्थानावर आहे.
कोलकाता नाईट राइडर्सचा संघ गुणतालिकेमध्ये १२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कोलकताने आतापर्यत ९ सामने खेळले आहेत त्यामध्ये त्यांनी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स आपल्या घरच्या मैदानावर विजयाची नोंद करून प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न करेल. मुंबईला शेवटच्या सामन्यात लखनौकडून 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याच वेळी, KKR संघ विजयी रथावर स्वार आहे, त्याने आपल्या शेवटच्या सामन्यात दिल्लीचा सात गडी राखून पराभव केला.
जाणून घ्या मुंबईच्या खेळपट्टीचा अहवाल
आजच्या सामन्यातील वानखेडे स्टेडियमच्या खेळापतीबद्दल बोलायचे झाले तर तर ती पूर्णपणे सपाट आहे. येथे फलंदाज खूप धावा करताना दिसतात. गोलंदाजांना या मैदानावर फारशी मदत होत नाही. परंतु संथ चेंडू खूप प्रभावी ठरू शकतात. येथील सामना उच्च स्कोअरिंग असेल आणि दव लक्षात घेता, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.