फोटो सौजन्य : IndianPremierLeague
इंडीयन प्रिमियर लीग २०२५ चा आज फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने २०२५-२६ हंगामासाठी त्यांचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यात अनेक स्टार खेळाडूंना संधी मिळालेली नाही, ज्यामध्ये केन विल्यमसन, डेव्हॉन कॉनवे आणि फिल अॅलन सारख्या खेळाडूंची नावे आहेत.
त्याच वेळी, केंद्रीय कराराच्या यादीत प्रवेश केलेल्या नवीन खेळाडूंमध्ये मिच हे, मुहम्मद अब्बास, झॅक फौल्क्स आणि आदि अशोक यांचा समावेश आहे. या खेळाडूंनी गेल्या एका वर्षात चमकदार कामगिरी करून केंद्रीय करार मिळवले आहेत. केंद्रीय कराराबद्दल, न्यूझीलंड क्रिकेटचे सीईओ स्कॉट वेनिंक म्हणाले, ‘मिच, मुहम्मद, आदि आणि जॅक यांच्यासोबतचे करार आमच्या प्रणालीतून येणाऱ्या अविश्वसनीय प्रतिभेचे प्रतिबिंब आहेत. या खेळाडूंनी दाखवून दिले आहे की ते मोठ्या पातळीवर स्पर्धा करू शकतात आणि ब्लॅककॅप्सचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची भूक रोमांचक आहे. ही यादी आमच्या प्रतिभा पूलची खोली आणि बहुमुखी प्रतिभा दर्शवते.’
न्यूझीलंडच्या करारामध्ये मायकेल ब्रेसवेल याला देखील सेंट्रल काॅन्ट्रक्ट मिळाला आहे, त्याने न्यूझीलंड संघाचे नेतृत्व केले आहे. काइल जेमिसन हा संध्या पंजाब किंग्सच्या संघाचा भाग आहे, त्यालाही सेंट्रल काॅन्ट्रक्ट मिळाला आहे, आज पंजाब किंग्सचा संघ राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध खेळणार आहे.
A look to the future for New Zealand 👀
More on the new members of the Black Caps’ central contract list 📝https://t.co/1D4y8jNHtt
— ICC (@ICC) June 3, 2025
रचिन रवींद्र आणि मिशेल सँटनर या दोघांना देखील सेंट्रल काॅन्ट्रक्टमध्ये सामील करण्यात आले आहे. रचिन रवींद्र याने चॅम्पियन ट्राॅफीमध्ये कमालिचा खेळ दाखवला होता. आयपीएल २०२५ मध्ये तो सीएसकेचा भाग होता पण तो चांगली कामगिरी करु शकला नाही. मिशेल सँटनर हा मुंबईच्या संघामध्ये आयपीएल २०२५ होता त्याने काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.
आदित्य अशोक, मायकेल ब्रेसवेल, टॉम ब्लंडेल, मार्क चॅपमन, जेकब डफी, जॅक फौल्क्स, मिच हे, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, मुहम्मद अब्बास, हेन्री निकोल्स, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, बेन सियर्स, नॅथन स्मिथ, विल यंग.