फोटो सौजन्य : IndianPremierLeague
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स Playing 11 : इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग या दोन संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही फारच महत्वाचा असणार आहे कारण आज जो संघ विजयी होणार आहे तो संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या इतिहासामध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकणार आहेत. यंदा आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीचे कर्णधारपद हे रजत पाटीदार यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्याचबरोबर श्रेयस अय्यरने कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सोडला आणि मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर पंजाब किंग्सच्या संघाने मोठी बोली लावली आणि श्रेयस अय्यर संघामध्ये सामील केले.
पंजाबच्या संघाने क्वालिफायर 2 मध्ये मुंबईच्या संघाला पराभूत करून संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात विजय मिळवणे ही प्रत्येक संघाचे स्वप्न असते त्यामुळे संघ हे त्याच्या स्क्वडमधील बेस्ट ११ खेळाडूंना फायनलमध्ये खेळवतील. दोन्ही संघ आज त्यांच्या दोन्ही संघामध्ये कोणत्या खेळाडूंना खेळवणार दोन्ही संघाची काय प्लेइंग इलेव्हन असणार या संदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असे म्हटले जात आहे की आरसीबी आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ त्यांच्या मागील सामन्यांमध्ये जे खेळाडूसोबत खेळले होते संघाची प्लेइंग ११ असू शकते.
मागील सामन्यात पंजाबच्या संघामध्ये युझवेंद्र चहल याचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे त्याने मागील सामन्यात १ विकेट घेतला होता. त्याचबरोबर सलामीवीर फलंदाज प्रभसिमरण सिंह आणि प्रियांश आर्या हे दोघे संघासाठी खेळतील. तिसऱ्या स्थानावर जोश इंग्लिश फलंदाजी करेल त्याने मागील सामन्यात चांगली फलंदाजी केली होती चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यर खेळेल. पाचव्या स्थानावर नेहल वढेरा याने संघासाठी कमालीची खेळ मागील काही सामन्यात दाखवला आहे.
सहाव्या स्थानावर शशांक सिंग हा फलंदाजीं करतो त्याने संघासाठी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली आणि त्यामुळे श्रेयस अय्यर त्याच्यावर संतापला होता. त्याचबरोबर मार्कस स्टॉयनिस आणि अजमततुला उमरजाई हे दोघेही मजबूत फलंदाजी करतात त्यामुळे संघासाठी मोठी फलंदाजीसाठी ऑप्शन आहेत. गोलंदाजांमध्ये वैशांक विजय कुमार, युझवेंद्र चहल, काइल जेमिसल आणि अर्शदीप सिंह याचा समावेश आहे.
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाबद्दल सांगायच झाल तर विराट कोहली सध्या दमदार फार्ममध्ये आहे, त्याने संघासाठी सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे, त्याचबरोबर त्याचा जोडीदार फिल्ल साॅल्ट देखील चांगल्या फार्ममध्ये आहे. त्याने मागील सामन्यात अर्धशतक झळकावले होते. रजत पाटीदार याने सुरुवातीच्या काही सामन्यात चांगली कामगिरी केली होती, पण काही सामन्यात तो विशेष कामगिरी केली नाही. जितेश शर्माच्या कमालीच्या खेळीने लखनऊला पराभुत केले होते. जोस हेझलवुड याचे संघामध्ये पुनरागमन झाले आहे.
राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुची संभाव्य प्लेइंग 11
विराट कोहली, फिल्ल साॅल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंस्टन, जितेश शर्मा, रोमरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड, सुयश शर्मा
पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग 11
प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, जोस इंग्लिॉश, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टायनिस, अजमतुल्ला उमरजाई, विशक विजय कुमार, काइल जेमिसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह