फोटो सौजन्य - सोशल मिडिया
न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे, या मालिकेचा पहिला सामना सुरु आहे, या मालिकेमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला पण आता वेस्ट इंडिजच्या संघाता शाई होप याने न्यूझीलंडसमोर आव्हान उभे केले आहे. वेस्ट इंडिजचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज शाई होपने शुक्रवारी मोठा प्रभाव पाडला. ३२ वर्षीय फलंदाजाने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावून संघाच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिज ५३१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होते. एका वेळी तीन फलंदाज फक्त ५५ धावांवर बाद झाले होते. तेथून होपने जस्टिन ग्रीव्हजसह डावाची सूत्रे हाती घेतली. होपने आक्रमक फलंदाजी केली आणि वाईट चेंडूंना सीमारेषेबाहेर मारले. पहिल्या डावात होप वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने १०७ चेंडूंचा सामना केला आणि ५६ धावा केल्या.
२०२५ मध्ये होपने त्याचे दुसरे कसोटी शतक झळकावले. याआधी, त्याने आठ वर्षांपासून कसोटी शतक झळकावले नव्हते. या वर्षाच्या सुरुवातीला दिल्ली कसोटीत त्याने भारताविरुद्ध १०३ धावा केल्या. याआधी, त्याने २०१७ मध्ये दोन शतके झळकावली होती. तो दोन कसोटी शतकांमधील सर्वाधिक डाव (५८) करणारा फलंदाजही ठरला. होप काही काळासाठी कसोटी संघाबाहेर होता.
🚨 TEST HUNDRED FOR SHAI HOPE IN THE 4th INNINGS IN NEW ZEALAND 🚨 – Chasing 531 runs.
– 72/4 at one stage.
– Eye Infection. WHAT A REMARKABLE YEAR FOR HOPE IN ALL FORMATS, The One man Army. 🫡 pic.twitter.com/sZ9QyXk7Bv — Johns. (@CricCrazyJohns) December 5, 2025
होपने इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीत सर्वाधिक धावा केल्या आहेत . त्याने १० कसोटी सामन्यांच्या १९ डावांमध्ये ३४.०५ च्या सरासरीने ६१३ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके केली आहेत. न्यूझीलंडविरुद्ध होपने तीन कसोटी सामन्यांच्या सहा डावांमध्ये ४६ पेक्षा जास्त सरासरीने २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. एका शतकाव्यतिरिक्त त्याने एक अर्धशतकही केले आहे.
होपने २०१५ मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ४४ कसोटी सामने खेळले आहेत. ८४ डावांमध्ये त्याने २७ पेक्षा जास्त सरासरीने २,१०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने चार शतके आणि सहा अर्धशतके केली आहेत. त्याचा सर्वोत्तम धावसंख्या १४७ आहे. २०२५ मध्ये, होप सुमारे ४० च्या सरासरीने धावा करत आहे.






