फोटो सौजन्य - बांग्लादेश क्रिकेट सोशल मीडिया
बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान : बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामान्यांची मालिका सुरु आहे. यामध्ये पहिल्या कसोटी सामन्यामध्ये बांग्लादेशच्या संघाने १० विकेट्सने सामना एकतर्फी जिंकला होता. त्यामुळे बांग्लादेशच्या संघाकडे १-० अशी आघाडी आहे. या सामन्यांमध्ये सध्या असे चित्र दिसत आहे की, बांग्लादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा पराभव होणार आहे. सध्या सामना सुरु आहे. बांग्लादेशचा कर्णधार शांतोने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत पहिल्या इनिंगमध्ये २७४ धावा करून संघ सर्वबाद झाला. बांग्लादेशच्या संघाने फलंदाजी करत पहिल्या इनिंगमध्ये लिटन दासच्या दमदार फलंदाजीने संघ २६२ धावा करू शकला.
दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानचा संघ डगमगला आणि फक्त बांग्लादेशच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना १७२ धावांवर रोखले. आता बांग्लादेशचा संघ फलंदाजी करत आहे. यामध्ये त्यांना फक्त ७० धावांची गरज आहे. त्यामुळे बांग्लादेशचा संघ मालिका नावावर करेल असे आतातरी चित्र दिसत आहे.
हेदेखील वाचा – विराट कोहलीचं नाव गाजलं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये! व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावुक
पाकिस्तानच्या पहिल्या इनिंगच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर सैम अयुब, शान मसूद आणि सलमान अली अघा यांनी प्रत्येकी अर्धशतक ठोकले होते. बांग्लादेशच्या पहिल्या इनिंगमध्ये लिटन दास आणि मेहदी हसन मिराज यांनी कमालीची फलंदाजी करत संघाला चांगल्या स्थितीत उभे केले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानचा संघ डगमगला आणि एकही फलंदाजाने ४७ पुढे धावा केल्या नाहीत, त्यामुळे ते मोठी धावसंख्या उभी करू शकले नाही. झाकीर हसन याने बांग्लादेशच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे, त्यामुळे बांग्लादेशच्या संघाचा विजयाचे चित्र दिसत आहे.
Pakistan 🆚 Bangladesh | 2nd Test
Stumps – Day 04 | Bangladesh need 143 runs.PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/V2Omq2Pfyt
— Bangladesh Cricket (@BCBtigers) September 2, 2024