फोटो सौजन्य - Pakistan Cricket सोशल मीडिया
Pakistan vs New Zealand first T20 match : सध्या न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये पाच सामान्यांच्या T२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेचा आज पहिला सामना सुरु आहे. या मालिकेमध्ये अनेक महत्वाचे दोन्ही संघामधील खेळाडू संघाबाहेर आहेत. न्यूझीलंडचा संघ मायकेल ब्रेसवेलच्या नेतृत्वात खेळात आहे तर पाकिस्तानचा संघ सलमान अली आघा यांच्या कॅप्टन्सीमध्ये खेळत आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु अअसलेला सामना ओव्हल येथील हॅग्ली पार्क साउथ येथे सुरु आहे.
या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पाकिस्तानच्या संघासमोर पहिल्या डावांमध्ये फलंदाजीचे आव्हान होते पण पाक संघ विशेष कामगिरी करू शकला नाही. न्यूझीलंडचा संघ नुकत्याच झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी २०२५ चा उपविजेता संघ आहे. सध्या किवी संघ दमदार फॉर्ममध्ये पाहायला मिळाला आहे. या चॅम्पियन ट्रॉफीचा संघ भाग कॅप्टन मायकेल ब्रेसवेल देखील होता. त्याने स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. पाकिस्तनच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर पहिले दोन्ही सलामीवीर फलंदाज एकही धाव न करता पॅव्हेलियनमध्ये परतले.
Career-best T20I figures for Jacob Duffy (4-14) and Kyle Jamieson (3-8) helps restrict Pakistan to 91/10 here at Hagley Oval. Follow LIVE & free in NZ on TVNZ 1, TVNZ+, Sport Nation & The ACC.
📸 @photosportnz | #PAKvNZ #CricketNation pic.twitter.com/ehLwszatmi
— BLACKCAPS (@BLACKCAPS) March 16, 2025
पाकिस्तानच्या संघासाठी सर्वाधिक धावा खुशदील शाह याने ३२ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार सलमान अली आघा याने फक्त १८ धावा करून बाद झाला. जहाँदाद खान याने संघासाठी फक्त १७ धावा केल्या, याव्यतिरिक्त एकही फलंदाजाने दुहेरी आकडा पार केला नाही. पाकिस्तानच्या खराब कामगिरीमुळे संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. न्यूझीलंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर काइल जेमिसन याने संघासाठी तीन विकेट घेतले. तर जेकब डफीने टीमसाठी चार विकेट्सची कमाई केली. झकरी फौल्क्स १ विकेट घेतला आणि ईश सोधीने संघासाठी २ विकेट घेऊन मोलाचे योगदान दिले.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच सामान्यांची T२० मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. या मालिकेचा दुसरा सामना १८ मार्च रोजी मंगळवारी खेळवला जाणार आहे तर तिसरा सामना २१ मार्च होणार आहे. चौथा सामना २३ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मालिकेचा शेवटचा सामना २६ मार्च रोजी होणार आहे.