फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया
Women’s Premier League 2025 Final Match winner : १५ मार्च रोजी शनिवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आठ धावांनी पराभव करून मुंबई इंडियन्सने त्यांचे दुसरे महिला प्रीमियर लीग विजेतेपद जिंकले. तर दिल्ली कॅपिटल्सचा तिसऱ्यांदा फायनलच्या सामन्यांमध्ये पराभव झाला आहे आणि एवढ्या जवळ येऊन तिसऱ्यांदा जेतेपद हुकले आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघासाठी ६६ धावा केल्या.
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाने ७ विकेटच्या मोबदल्यात १४९ धावा केल्या. संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने ४४ चेंडूत ६६ धावांची धमाकेदार खेळी केली, तर नॅट सीवर-ब्रंटने ३० धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात, दिल्ली संघ निर्धारित षटकांत नऊ गडी बाद केवळ १४१ धावा करू शकला आणि सामना आठ धावांनी गमावला. दिल्ली संघासाठी हा पराभव खूप निराशाजनक आहे कारण तो तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात पराभूत झाला. अंतिम फेरीत पुन्हा एकदा तिच्या संघाच्या पराभवामुळे कॅप्टन मेग लॅनिंग खूप दुःखी आहे.
सामना झाल्यांनतर मेन लॅनिंगने तिचे दुःख व्यक्त केले आहे. संघासाठी सामन्यानंतर कॅप्टन म्हणाली की, ‘आमचा आणखी एक चांगला सिझन गेला आहे, पण दुर्दैवाने आज रात्री आम्ही पुन्हा जिंकू शकलो नाही.’ संपूर्ण हंगामात शानदार कामगिरी करणाऱ्या मुंबईला सर्व श्रेय जाते. मुंबई संघ विजयासाठी पात्र होता, त्यांनी चांगली कामगिरी केली. हा सामना आमच्यासाठी निराशाजनक होता, जिथे आम्हाला फलंदाजीत चांगली कामगिरी करता आली नाही. मला वाटले की १५० धावांचे लक्ष्य आमच्यासाठी चांगले होते. काही षटकांसाठी आणखी एक भागीदारी झाली असती तर आम्हाला संधी मिळाली असती, पण आम्हाला आमच्या गटाचा अभिमान आहे.
After topping the table thrice 💔💔💔 #DelhiCapitals pic.twitter.com/opxaAiqLUx
— Cricbuzz (@cricbuzz) March 15, 2025
पुढे ती म्हणाली की, आमचा हंगाम चांगला गेला, काही छान क्षण अनुभवले, पण हो, आम्ही सर्वजण खूप निराश आहोत. आज रात्री मुंबईने आमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. अंतिम सामन्यात आम्ही आमचे सर्वोत्तम प्रदर्शन करू शकलो नाही, जे निराशाजनक आहे. पण हे क्रिकेट आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही. आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ दाखवू शकू यासाठी आम्ही पूर्णपणे तयारी करून येथे आलो होतो. पण आम्ही अंतिम सामना गमावला. आम्ही अत्यंत निराश झालो आहोत. आम्हाला वाटले की आम्ही जिंकण्यासाठी स्वतःला चांगल्या स्थितीत ठेवले आहे, पण खेळ हाच आहे. तुम्ही काही जिंकता, काही हरता आणि दुर्दैवाने आम्ही पराभूत संघाचा भाग आहोत.