यूएई : आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग (Pakistan Vs Hongkong) या दोघांमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगचा दारुण पराभव केला. हाँगकाँग संघाला ३८ धावांवर सर्वबाद करून सुपर ४ मध्ये दणक्यात एंट्री मिळवली. पाकिस्तानने हाँगकाँगला तब्बल १५५ धावांच्या फरकाने पराभूत केल्यानंतर पाकिस्तान संघाने टी २० सामन्यांमध्ये मोठा इतिहास रचला.
पाकिस्तानने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हाँगकाँग विरुद्ध मोठ्या धावसंख्येच्या फरकाने विजय मिळवला आहे. याआधी भारताच्या १४३ धावांच्या फरकाने विजय मिळवलेल्या रेकॉर्डला मागे टाकत पाकिस्तानने १५५ धावांच्या फरकाने नवा रेकॉर्ड नावावर केला आहे. याआधी श्रीलंकेने २००७ साली केनिया संघाला १७२ धावांच्या फरकाने मात दिली होती, हा रेकॉर्ड आजही आबाधित आहे.
[read_also content=”आता भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; ४ सप्टेंबरला महामुकाबला https://www.navarashtra.com/sports/now-india-pakistan-face-to-face-again-grand-match-on-september-4-321948.html”]
सर्वाधिक फरकाने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील विजय :
१७२ श्रीलंका विरुद्ध केनिया २००७
१५५ पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग, शारजाह २०२२
१४३ भारत विरुद्ध आयर्लंड २०१८
१४३ पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज २०१८
१३७ इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज २०१९