 
        
            ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी प्रत्येक देशातील संघ आता सज्ज होत आहेत. या विश्वचषकासाठी भारतासह अनेक संघानी आपली नवी जर्सी लाँच केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने आपली जर्सी लाँच केल्यानंतर आता पाकिस्तान संघाने देखील काल सोमवारी आपली नवी जर्सी लाँच केली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) टी२० विश्वचषक २०२२ (ICC T20 World Cup) पार पडणार आहे. १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून यातील १३ देशांनी आपले संघही जाहीर केले आहेत. पीसीएलमधील संघ इस्लामाद युनायटेडच्या ट्वीटर हँडलवरही या जर्सीचे फोटो असून जर्सी समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या जर्सीचे फोटो शेअर केले आहेत.
पाकिस्तान संघाने (Pakistan) जर्सी लाँच केल्यानंतर खेळाडूंकडून नवी जर्सी घातलेले फोटो ही शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये कर्णधार बाबर आझम (Babar Azam) तसंच युवा गोलंदाज नसीम शाह (Nasim Shah) , अष्टपैलू शादाब खान (Shadab Khan) यांच्यासह महिला खेळाडूही दिसत आहेत. पाकिस्तान संघ हीच जर्सी घालून स्पर्धेत उतरणार असून त्यांचा पहिला सामना भारताविरुद्ध असणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना २६ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मैदानात खेळवला जाणार आहे.






