फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
पाकिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या आधी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात त्रिकोणी एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. बऱ्याच काळानंतर त्रिकोणी एकदिवसीय मालिका पाहायला मिळाली आहे. या मालिकेत अंतिम सामन्यासह फक्त चार सामने खेळले जाणार आहेत, त्यापैकी दोन सामने आधीच खेळले गेले आहेत. यामध्ये पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवला होता तर दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये देखील न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून नाबाद मालिकेमध्ये फायनलच्या शर्यतीत कायम आहे.
न्यूझीलंड संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर यजमान पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघांना अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी अजूनही नॉकआउट प्रकारच्या सामन्यांमधून जावे लागेल. हा सामना उद्या म्हणजेच बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. तिरंगी मालिकेतील तिसरा लीग सामना कराचीतील राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे, जो पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. पाकिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यामध्ये सिरींजचा तिसरा सामना भारतीय वेळेनुसार २.३० मिनिटांनी सुरु होणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड वेबसाईट आणि ऍपवर पाहू शकता.
Ranji Trophy मध्ये अजिंक्य रहाणेचा कहर, झळकावलं आणखी एक शतक, पुन्हा एकदा ठोकलं टीम इंडियाचा दार
यामागील कारण असे आहे की हा सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल, कारण दोन्ही संघांनी न्यूझीलंडकडून प्रत्येकी एक सामना गमावला आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना जो संघ जिंकेल, त्याला अंतिम फेरीत पुन्हा न्यूझीलंडचा सामना करावा लागेल. जर संघ हरला तर त्याला आणखी एक धक्का बसेल.
खरंतर, या तिरंगी मालिकेला या तिन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी ड्रेस रिहर्सल म्हटले जात आहे, कारण हे संघ याच मैदानांवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळणार आहेत. जर एखाद्या संघाला एक सामना कमी खेळण्याची संधी मिळाली, तर निश्चितच त्याची तयारी तितकी चांगली होणार नाही जितकी ती असायला हवी होती, कारण नेट प्रॅक्टिसपेक्षा मॅच प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. याशिवाय, संघाला कराचीमध्ये दुसरा सामना खेळण्याची संधी मिळेल, जेणेकरून संघाला या नूतनीकरण केलेल्या स्टेडियमच्या परिस्थितीची जाणीव होईल. आता हा सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे बाकी आहे.