फोटो सौजन्य : IndianPremierLeague
पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा अहवाल : दिल्लीचा आज शेवटचा सामना हा सवाई मानसिंग स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध पार पडला. या सामन्यात फाफ डुप्लेसीने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात पहिले फलंदाजी करत पंजाबच्या संघाने आठ विकेट्स गमावून 206 धावा केल्या होत्या. या सामन्यात संघाला चांगली सुरुवात करून दिल्यानंतर मधल्या फळीत करून नायर आणि समीर रिजवी या दोघांनी चांगली भागीदारी करून संघाला संकटातून बाहेर काढलं आणि संघाला विजय मिळवून दिला. या सामना दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर वाचा.
दिल्ली कॅपिटलच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर केएल राहुल आणि फाफ डुप्लेसीने आजच्या सामन्यांमध्ये संघाला दमदार सुरुवात करून दिली. के एल राहुल ने आजच्या सामन्यामध्ये 21 चेंडूंमध्ये 35 धावा केल्या. तर डुप्लेसी याने आज 15 चेंडूंमध्ये 23 धावा केल्या या त्याने एक षटकार आणि दोन चौकार मारले. आजच्या सामन्यांमध्ये करून नायर याची कमालीची खेळी पाहायला मिळाली. त्याने आजच्या सामना 27 चेंडूंमध्ये 44 धावा केला यामध्ये त्यांनी दोन षटकार आणि पाच चौकार मारले. आजच्या सामन्यामध्ये पदार्पण करणारा सादिकुल्ला अटल याने आजच्या सामन्यात 16 चेंडूंमध्ये 22 धावा केल्या यामध्ये दोन षटकांचा देखील समावेश आहे.
आजच्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स साठी समीर रिझवी याने संघाला मॅच विनिंग इनिंग खेळून संघाला विजय मिळवून दिला. त्याने आजच्या सामन्यात 25 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या आणि त्याचबरोबर तो नाबाद राहिला. यामध्ये त्याने पाच षटकार आणि तीन चौकार मारले. ट्रिस्टन स्टॅब्स जाने त्याला दुसऱ्या विकेट ने साथ दिली आणि स्टॅब्स आजच्या सामन्यात 14 चेंडूंमध्ये 18 धावा केल्या.
A superb innings under pressure 👏
Maiden #TATAIPL fifty for Sameer Rizvi 👌
Updates ▶ https://t.co/k6WP8zBwzL #PBKSvDC pic.twitter.com/7kaAWjQUmR
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2025
पंजाब किंग्सच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर हरप्रीत ब्रार याने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले त्याचबरोबर मार्को जॉन्सन आणि प्रवीण दुबे या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने या हंगामातील त्याचे पाचवे अर्धशतक ठोकले आहे. कॅप्टन अय्यर नेहमीच कठीण काळात आपल्या संघासाठी उभे राहिले. अय्यरने या हंगामात १३ सामन्यांमध्ये ४८.८० च्या सरासरीने ४८८ धावा केल्या आहेत. या काळात, अय्यरचा स्ट्राईक रेट १७२.४४ राहिला आहे. अय्यरनेही ९७ धावांची शानदार खेळी केली. अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज संघाने ११ वर्षांनंतर प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. या हंगामात, पंजाब संघ पहिल्यांदाच ट्रॉफी उंचावण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.