सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवाग(फोटो-सोशल मीडिया)
PBKS vs RCB : आरसीबीने ३ जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या आयपील २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबीने इतिहास रचला. संघाने १७ वर्षांचा दुष्काळ संपवत पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. आरसीबीच्या विजयानंतर संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली भावुक झाल्याचे दिसून आला होता. त्यानंतर तो मैदानावरच रडला होता. त्याचीच सदया चर्चा सुरू आहे. दरम्यान, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे एक मनोरंजक खुलासा आहे. हा खुलासा करताना तो म्हटलं की, सचिन तेंडुलकर विराटपेक्षा ट्रॉफीची जास्त वाट पाहत होता.
भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागला आरसीबीच्या विजयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला की, “कोहलीने ट्रॉफी जिंकण्यासाठी फक्त १८ वर्षे वाट पाहिली आहे, तर दुसरीकडे, सचिन तेंडुलकरने १९८९ ते २०११ पर्यंत विश्वचषकाच्या ट्रॉफीची वाट पाहिलीया आहे. अशा परिस्थितीत, कोहलीची वाट पाहाणे सचिनपेक्षा कमी होते. तरी देखील सचिन तेंडुलकरने आशा सोडली नाही. सचिनने मनात ठरवले होते की जेव्हा विश्वचषक ट्रॉफी त्याच्या हातात असेल तेव्हाच तो निवृत्त होईल.”
वीरेंद्र सेहवाग पुढे म्हणाला की, “आता विराट कोहलीसाठी देखील असेच होणार आहे, तो आता सुटकेचा नि:श्वास सोडू शकतो. विराट आता आनंदी राहून आयपीएल खेळणे देखील सोडू शकतो. विराट आता त्याला हवे तेव्हा निवृत्तीचा निर्णय घेण्यास तयार आहे, एक खेळाडू ट्रॉफी जिंकण्यासाठी खेळतो.”
माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे की, “पैसे येत येतात आणि जातात, परंतु ट्रॉफी जिंकणे काही सोपे नाही. आता कोहलीची वाट संपली आहे. तथापि, या हंगामात कोहलीचे योगदान खूप महत्वाचे होते.” असे सेहवागने म्हणाला आहे.
आरसीबी संघ १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेता बनला आहे. पंजाबला पराभूत करत आरसीबीने इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली (४३), रजत पाटीदार (२६), लियाम लिव्हिंगस्टोन (२५) आणि जितेश शर्मा (२४) यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाबला विजयापासून रोखले. पीबीकेएसकडून शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.