भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे (Anil Kumble) आता आयपीएलच्या (IPL) येत्या सिझनमध्ये पंजाब किंग्जचा (Punjab Kings) मुख्य प्रशिक्षक नसणार आहे. आयपीएल मधील लोकप्रिय संघ असलेल्या पंजाब किंग्स फ्रँचायझीने अनिल कुंबळे याचा मुख्य प्रशिक्षक म्हणून असलेला करार त्याचा न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा, उद्योगपती मोहित बर्मन, नेस वाडिया, करण पॉल आणि किंग्जचे सीईओ सतीश मेनन यांच्यासह बोर्डाच्या इतर सदस्यांच्या बैठकीनंतर कुंबळेबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोने एका अहवालात म्हटले की, “कुंबळेची २०२० सिजनपूर्वी पंजाब किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आणि पुढील तीन सिझनसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.” मात्र आता त्यांचा करार संपला असून तो पुढे न वाढवण्याचा निर्णय पंजाब किंग्स फ्रँचायझीने घेतला आहे. पंजाब संघासाठी आता फ्रँचायझी नवीन प्रशिक्षकाच्या शोधात असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुंबळेची प्रशिक्षक म्हणून कामगिरी :
कुंबळे च्या मुख्य प्रशिक्षक पदाच्या कारकिर्दीतील तीनही सिझनमध्ये पंजाब किंग्ज आयपीएलच्या गुणतालिकेत तळाशी राहिली. २०२० आणि २०२१ मध्ये गुणतालिकेत संघ पाचव्या क्रमांकावर होता, जेव्हा लीगमध्ये आठ टीमचा समावेश होता. २०२२ मध्ये, दहा टीम्सची लीग खेळली गेली आणि तेव्हा पंजाबचा संघ सहाव्या क्रमांकावर होता.