भाजपने राखला आपला गड (फोटो- सोशल मीडिया)
प्रभाग क्रमांक ३९ आणि ४० भाजपचा विजय
प्रभाग क्रमांक ३९ मध्ये ठरली लक्षणीय कामगिरी
३९ ‘ब’ राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली
पुणे: कोंढवा–येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३९ आणि ४० मध्ये भारतीय जनता पार्टीने आपला बालेकिल्ला कायम राखत निर्णायक वर्चस्व सिद्ध केले आहे. या भागात झालेल्या मतमोजणीअंती बहुसंख्य जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवत राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली.
प्रभाग क्रमांक ३९ मध्ये भाजपची कामगिरी लक्षणीय ठरली. ३९ ‘अ’ मधून वर्षा साठे, ३९ ‘क’ मधून रूपाली धाडवे आणि ३९ ‘ड’ मधून बाळा ओसवाल हे भाजपचे उमेदवार विजयी झाले. मात्र ३९ ‘ब’ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतीक कदम यांनी बाजी मारत या प्रभागात भाजपची एक जागा रोखली. तरीही एकूण निकाल पाहता प्रभाग ३९ वर भाजपचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले.
प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी येथे तर भाजपने ‘क्लीन स्वीप’ दिला. अर्चना जगताप, वृषाली कामठे, पूजा कदम आणि रंजना टिळेकर या चारही उमेदवारांनी विजय मिळवत भाजपचा गड अधिक भक्कम केला. या प्रभागात आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचे राजकीय प्राबल्य असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. विशेष म्हणजे, त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर या पुन्हा निवडून आल्याने टिळेकर कुटुंबाचा प्रभाव मतदारांनी स्पष्टपणे मान्य केल्याचे चित्र आहे.
PMC Elections Result : पुण्यातील प्रभाग 33 मध्ये तुतारी वाजली; अनिता इंगळे विजयी
दरम्यान, भाजपमधून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविका संगीता ठोसर यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच प्रभाग ३९ मधून चर्चेत असलेले कुमार उर्फ बापू नायर यांनाही मतदारांचा अपेक्षित पाठिंबा मिळू शकला नाही. एकूणच, कोंढवा–येवलेवाडी परिसरात भाजपने आपली संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्व आणि मतदारांशी असलेला संपर्क यांचा प्रभावी वापर करत बालेकिल्ला अभेद्य राखल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. विरोधकांना काही ठिकाणी यश मिळाले असले, तरी या विभागात सत्ता आणि प्रभाव भाजपकडेच असल्याचे मतदारांनी ठामपणे अधोरेखित केले.
अनिता इंगळे विजयी
राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडलं. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, लवकरच सर्व प्रभागाचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. आजच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही जागांचे निकाल हाती आले आहेत. पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ (ब) मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अनिताताई तुकाराम इंगळे विजयी झाल्या आहेत.






