फोटो सौजन्य : Cognizant Major League Cricket
मेजर क्रिकेट लीग सुरु झाला आहे, यामध्ये अनेक रेकाॅर्ड पाहायला मिळत आहेत. या लीगमध्ये अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा चाौथा सामना पार पडला हा सामना सिएटल ऑर्कास विरुद्ध वाशिंगटन फ्रीडम या दोन संघामध्ये खेळवण्यात आला होता. वाशिंगटन फ्रीडमचे कर्णधारपद हे ग्लेन मॅक्सवेलकडे आहे तर सिएटल ऑर्कास या संघाचे नेतृत्व हेनरिक क्लासेन करत आहे. आयपीएल 2025 चा सिझन संपला आणि आता मेजर क्रिकेट लीग सुरु झाले आहे. आयपीएल ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते.
आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची उधळण केली जाते, आयपीएल 2025 मध्ये मेगा ऑक्शन पार पडले. यामध्ये रिषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. रचिन रविंद्र हा मेजर क्रिकेट लीग सध्या खेळत आहे, त्याने या सामन्यात चांगली कामगिरी केली आणि त्याच्या संघाला विजय मिळवुन देण्यात मोलाचे योगदान दिले. त्याने या सामन्यात सिएटल ऑर्कासविरुद्ध 44 धावांची खेळी खेळली होती, पण तो या आयपीएल 2025 सिझनमध्ये फार काही चांगली कामगिरी करु शकला नाही.
भारत विरुद्ध इंग्लड या मालिकेआधी डेल स्टेनने केली भविष्यवाणी! हा संघ 3-2 ने होणार विजेता
रचिन रविंद्र हा आयपीएल 2025 च्या सिझनमध्ये सुरुवातीचे काही सामने खेळला आणि त्यानंतर तो फेल ठरला त्यामुळे त्याला संघामधुन बाहेर ठेवण्यात आले. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने या सिझनमध्ये रचिन रविद्र याला 4 कोटींना विकत घेतले होते. पण तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. आज सिएटल ऑर्कास विरुद्ध वाशिंगटन फ्रीडम यांच्यामध्ये सामना पार पडला या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सिएटल ऑर्कास विरुद्ध वाशिंगटन फ्रीडम सामन्याबद्दल सांगायचे झाले तर सिएटल ऑर्कास यांनी नाणेफेक जिंकुन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिले फलंदाजी करत सिएटल ऑर्कास यांनी 9 विकेट्स गमावुन 145 धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रतित्युरात 13.3 ओव्हरमध्ये वाशिंगटन फ्रीडम यांनी हे लक्ष्य पुर्ण केले आणि विजय मिळवला.
Clinical win for @WSHFreedom 🦅🔥 pic.twitter.com/U5q24ZUjoY
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) June 15, 2025
वाशिंगटन फ्रीडमच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर रचिन रविद्र यांने 44 धावांची खेळी खेळली. कर्णधार ग्लेन मॅक्सवेल याने नाबाद 38 धावा केल्या. मिचेल ओव्हन याने संघासाठी 25 महत्वाच्या धावा केल्या. अँड्रिज गॉस याने 16 धावांची खेळी खेळली.