फोटो सौजन्य - X
RCB VS KKR सामना रद्द : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आज सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारत पाकिस्तान यांच्या तणावाचा वातावरणामुळे दहा दिवसांसाठी आयपीएल स्थगित करण्यात आली होती त्यानंतर आज आयपीएलची सुरुवात होणार होती परंतु बंगळुरूमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सामना होणे शक्य झाले नाही त्यामुळे अंपायरने सामना रद्द घोषणा करण्यात आले आहे आणि दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला आहे.
आजचा सामना रद्द झाल्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा खूपच नुकसान झाले आहे. सामना रद्द झाल्यामुळे कोलकत्ता नाईट रायडर्स संघ हा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. सध्या कोलकत्ता नाईट रायडर्स संघ गुणतालिकेमध्ये सहाव्या स्थानावर आहे. संघाचे आत्तापर्यंत 13 सामने झाले आहेत, यामध्ये त्यांना पाच सामनात विजय मिळाला आहे तर सहा सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. एवढेच नव्हे तर त्यांचे दोन सामने हे पावसामुळे वाहून गेले होते त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
Match 58. Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders – Match Abandoned https://t.co/R7eQDiZoxH #RCBvKKR #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) May 17, 2025
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर आजचा सामना रद्द झाल्यामुळे बंगळुरूच्या संघाला फायदा झाला आहे. आजचा मिळालेला हा एक गुण त्यांना गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर नेले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा आत्तापर्यंत 12 सामने झाले आहेत. यामध्ये त्यांना आठ सामन्यात विजय मिळाला आहे तर तीन सामना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि एक चांगला पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आयपीएलच्या पॉइंट टेबल मध्ये आरसीबीच्या संघाने पहिल्या स्थान नावावर केले आहे त्यांचे आणखी दोन सामने शिल्लक आहेत त्यामधील एक सामन्यात विजय मिळवला असते प्ले ऑफ साठी पात्र ठरतील.
स्पेनमध्ये चाहत्याने कहरच केला! चक्क विद्यापीठात रोहितची जर्सी दाखवून दिला ट्रिब्यूट, Video Viral
आजचा सामना रद्द झाल्यानंतर आता साखळी सामान्य फक्त 12 शिल्लक आहेत. उद्या म्हणजेच रविवारी 18 मे रोजी दोन सामने खेळवले जाणार आहेत. या डबल हेडरच्या रविवारी पहिला सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना हा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये होणार आहे. राजस्थानचा संघ हा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. पंजाब किंग च्या संघाने उद्याचा सामना जिंकल्यास त्यांना चांगलाच फायदा होईल. दिल्ली कॅपिटल साठी उद्याचा सामना हा महत्त्वाचा असणार आहे त्यांना हा सामना जिंकणे अनिवार्य आहे तर गुजरात टायटनच्या संघाने या सामन्यात विजय मिळवल्यास ते प्ले ऑफ मध्ये स्थान पक्के करतील.