विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
RCB vs SRH : आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुला सनराइझर्स हैदराबादकडून ४२ धावांनी पराभत स्वीकारावा लगाला. हा सामना लखनऊच्या श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. या सामन्यात बंगळुरुच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर प्रथम फलंदाजी करत हैदराबादच्या संघाने ६ गडी गमावत २३१ धावा केल्या होत्या. या लक्षाचा पाठलाग करताना बंगळुरुचा संघ १८९ धावांच करू शकला. हा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुने जरी गमावला असला तरी विराट कोहलीने एक खास कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यात २५ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीच्या बॅटने शानदार कामगिरी केलीया आहे. त्याच्या संघासाठी डावाची सुरुवात करताना त्याने एकूण २५ चेंडूंचा सामना केला. या देरम्यान त्याने ७ चौकार आणि १ षटकार लगावला आहे. या खेळीत त्याने १७२.०० च्या स्ट्राईक रेटने ४३ धावा केल्या.
आयपीएल २०२५ च्या ६५ व्या सामन्यात सनराइझर्स हैदराबाविरुद्ध ४३ धावांची खेळी करून विक्रम केला आहे. त्याने टी-२० च्या क्रिकेटमध्ये संघाचे प्रतिनिधित्व करताना ८०० चौकार मारले. असे करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने आरसीबीसाठी ८००* चौकार लगावले आहेत. कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर इंग्लिश फलंदाज जेम्स विन्सचे नाव आहे. ज्याने हॅम्पशायरचे प्रतिनिधित्व करताना टी-२० क्रिकेटमध्ये ६९४ चौकार लगावले आहेत.
तर या यादीत अॅलेक्स हेल्स तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. हेल्सने नॉटिंगहॅमशायरकडून आतापर्यंत ५६३ चौकार मारले आहेत. चौथा खेळाडू म्हणून टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माचे नाव घ्यावे लागते.रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून खेळताना ५५० चौकार मारले आहेत. टॉप-५ मध्ये शेवटचे नाव ल्यूक राईट याचे आहे. ज्याने ससेक्सकडून खेळताना आतापर्यंत ५२९ चौकारांची बरसात केली आहे.
टी-२० मध्ये संघासाठी सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज खालीप्रमाणे