फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात बदल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये आज पासून एकदिवसीय मालिकेचा शुभारंभ होणार आहे. आज टीम इंडियाचा पहिला एकदिवसीय सामना इंग्लंडविरुद्ध रंगणार आहे. या सामन्याचे आयोजन नागपूरमध्ये करण्यात आले आहे. टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफी २०२५ च्या आधी ही एकमेव एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारताचा संघ युएईला स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. ही मालिका भारताच्या संघासाठी महत्त्वाची मालिका असणार आहे. टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी आधी या मालिकेमध्ये सराव करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर भारताच्या कोणत्या खेळाडूंची कशी कामगिरी आहे याचा देखील अंदाज येईल.
भारताच्या संघाची सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली नुकतीच T-२० मालिका पार पडली. यामध्ये भारतच्या संघाने या मालिकेमध्ये ४-१ असा विजय मिळवून जेतेपद नावावर केले. आता भारताचा संघ एकदिवसीय मालिकेमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानामध्ये उतरेल. आता भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना आज एक वाजता सुरू होणार होता या सामन्याच्या वेळेमध्ये आता बदल करण्यात आला आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
दिमुथ करुणारत्नेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा, ‘शतक’ पूर्ण केल्यानंतर निरोप घेणार
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेचा पहिला सामना ६ फेब्रुवारी रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० मिनिटांनी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे नाणेफेक सामना सुरू होण्याच्या अर्ध्यातासा आधी सुरू होणार आहे, म्हणजेच सामन्याचे नाणेफेक १ वाजता होईल.
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्सच्या विविध नेटवर्कवर भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना पाहू शकतात. तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार वेबसाइट किंवा अॅपवर भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. या सामन्याशी संबंधित प्रत्येक माहितीसाठी आणि IND विरुद्ध ENG लाईव्ह स्कोअरसाठी , तुम्ही लाईव्ह हिंदुस्तानच्या क्रिकेट पेजला भेट देऊ शकता.
गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात भारताने शेवटची एकदिवसीय मालिका खेळली होती. त्यानंतर राहुलने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये विकेटकीपिंग केले. एका सामन्यात त्याने ३१ धावा केल्या आणि दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. तर पंत तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात विकेटकीपिंग करत होता. त्याच्या बॅटमधून ६ धावा आल्या. बुधवारी पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार म्हणाला, “राहुल गेल्या अनेक वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये आमच्यासाठी विकेटकीपिंग करत आहे आणि त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. जर तुम्ही गेल्या १०-१५ एकदिवसीय सामन्यांवर नजर टाकली तर त्याने संघाला त्याच्याकडून जे अपेक्षित होते तेच केले आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.