नवी दिल्ली : भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याच्या गाडीला शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात पंत सुदैवाने बचावला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर आता ऋषभचे मेंदू आणि पाठीचा MRI रिपोर्ट समोर आला असून चाहत्यां मनातील धाकधूक वाढली आहे.
ऋषभ पंत उत्तराखंडमधील रुरकी या त्यांच्या मूळ गावी जात असताना त्यांची कार मंगलोरजवळ दुभाजकाला धडकली. पंत स्वतः कार चालवत होता. सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या अनेक तपासण्याही येथे झाल्या आहेत. पंतच्या डोक्याला आणि पायाला सर्वाधिक दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले आहे. ज्याचा अहवाल समोर आला आहे. ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले आहेत. या अहवालामुळे चाहत्यांना आणि खुद्द पंतला मोठा दिलासा मिळाला आहे.