फोटो सौजन्य - Star Sports सोशल मीडिया
रोहित शर्मा-रणजी ट्रॉफी : भारताच्या संघाच्या हाती मागील काही मालिकेमध्ये निराशा हाती लागली आहे. न्यूझीलंडच्या संघाने भारताला घराच्या मैदानावर मालिकेमध्ये पराभूत केलं. त्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पाच सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिका जिंकली या मालिकेमध्ये भारताच्या संघाला फक्त १ सामना जिंकता आला आहे. या मागील झालेल्या मालिकांमध्ये परभावनांतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली एवढेच नव्हे तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या कर्णधार पदावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फलंदाजी आणि कर्णधारपद या दोन्ही बाबतीत अपयशी ठरलेल्या टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची कारकीर्द सध्या अडचणीत सापडली आहे. रोहित शर्माची कारकीर्द फार काळ टिकेल असे वाटत नाही आणि अशा स्थितीत रोहित त्याला वाचवण्यास तयार आहे. रोहितवर त्याच्या फॉर्मवर टीका होत असून भारतीय कर्णधाराने त्यासाठी कामाला सुरुवात केली आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितची बॅट शांत राहिली. त्याला तीन सामन्यांत केवळ ३१ धावा करता आल्या. यानंतर रोहितच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. मेलबर्न कसोटी सामन्यानंतर रोहित निवृत्त होणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता, परंतु त्याच्या काही हितचिंतकांनी त्याला तसे करण्यापासून रोखले.
BCCI : संघाच्या लागोपाठ पराभवानंतर बीसीसीआयची कारवाई, पत्नींबाबत आणले नवे नियम
ऑस्ट्रेलियातून पुनरागमन केल्यानंतर रोहित थोडी विश्रांती घेत होता, मात्र आता तो विश्रांती सोडून मैदानाकडे वळला आहे आणि फॉर्ममध्ये परतण्याची तयारी करत आहे. रोहितने मुंबईच्या रणजी संघासोबत सराव केला आहे. रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर सराव केला. यावेळी तो सेंटर विकेटवर फलंदाजी करताना दिसला. यावेळी टीम इंडियाचा माजी सहकारी अजिंक्य रहाणेही त्याच्यासोबत फलंदाजी करत होता. रोहित त्याच्या निळ्या कारने वानखेडेला पोहोचला होता. रोहित पांढऱ्या कपड्यात बॅग आणि किटबॅग घेऊन जाताना दिसला. यादरम्यान तो चाहत्यांनाही भेटला आणि रोहितनेही चाहत्यांची इच्छा पूर्ण केली.
Rohit Sharma is back where it all began—training with the Mumbai Ranji team! 🏏 Preparation, passion, and focus in full swing.#RohitSharma pic.twitter.com/DWhqzyS1os
— Star Sports (@StarSportsIndia) January 14, 2025
सोशल मीडियावर रोहित शर्मा क्रिकेट किट घेऊन जातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहितने अलीकडेच बीसीसीआयच्या बैठकीला हजेरी लावली ज्यामध्ये संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव देवजीत सैकिया उपस्थित होते. या बैठकीत देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंवर भर देण्यात आला. रोहितने मुंबई संघासोबत सराव केला आहे, त्यामुळे तो रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वात खेळताना दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, रोहित खेळणार की नाही हे येणारा काळच सांगेल, मात्र तो पुन्हा फॉर्ममध्ये येण्यासाठी गंभीर असून मेहनत करण्यास सज्ज आहे हे मात्र निश्चित.