रोहित शर्मा आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. यामध्ये मालिकेतील शेवटचा सामना भारताने ६ धावांनी जिंकला आणि मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. या मालकेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. गोलंदाजी असो वा फलंदाजी दोन्ही आघाड्यांवर दमदार कर्तृत्व सिद्ध केलं आहे. तसेच मालिकेपूर्वी भारताचा युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वावर शंका घेतली जात होती. परंतु गिलने आपल्या बॅटसह आपल्या नेतृत्वाने देखील स्वतःला सिद्ध केलं. विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे दिग्गज नसताना या युवा संघाने मालिकेत चांगली कामगिरी करत मालिका बरोबरीत सोडली. आता कसोटी मालिकेचा थरार सम्पला असून भारत आशिया कप २०२५ च्या तयारीला लागेल. तसेच २०२७ मध्ये भारत एकदिवसीय विश्वचषक देखील खेळणार आहे. तेव्हा रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल असे बोलले जात असताना तो वर्ष संघाचा भाग असेल का? असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे संघाची धुरा शुभमन गिलकडे जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Asia Cup 2025 India: आशिया कपसाठी भारतीय टीमची लवकरच घोषणा, शुभमन, यशस्वी आणि साई सुदर्शनला संधी?
रोहित शर्माचे सद्याचे वय ३८ वर्ष आहे. येत्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत, तो ४० वर्षांचा असणार आहे. यापूर्वी, त्याच्या नेतृत्वाखाली संघाने टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. आता तो पुढील दोन वर्षे एकदिवसीय सामन्यात कर्णधारपदासह आपल्या फलंदाजीने स्वतःची जागा कायम ठेवू शकेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अशातच माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफने रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल आणि भविष्याबद्दल मोठे विधान केले आहे. तो म्हणाला की, एकदिवसीय कर्णधारपद शुभमन गिलला दिले जाऊ शकते.
माजी खेळाडू मोहम्मद कैफने शुभमन गिलला एकदिवसीय कर्णधारपद देण्याबद्दल स्पष्ट बोलला आहे. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले की, “गिलला एकदिवसीय कर्णधारपद मिळेल, कारण रोहित शर्मा एकदिवसीय स्वरूपात किती काळ खेळू शकेल याबद्द्ल आम्हाला माहित नाही. यावेळी गिल कर्णधार होण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये देखील शानदार कामगिरी करत सातत्याने धावा करता आहेत. त्याने कसोटी कर्णधार म्हणून देखील चांगली कामगिरी केली आहे.”
हेही वाचा : IND vs ENG: 3 खेळाडू ज्यांनी इंग्लंड दौऱ्यावर केले सर्वांना चकीत, कोणालाच नव्हती अपेक्षा!
मोहम्मद कैफ पुढे म्हणाला आहे की, “जेव्हा तुम्ही तरुण संघासोबत खेळता तेव्हा तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागत असतात. यामध्ये त्याने बॅटने धावा करणे आणि कर्णधार म्हणून चांगली कामगिरी बजावणे. या गोष्टीत येतात. शुभमन गिलसाठी हे सर्व काही चांगले राहिले आहे. शुभमन गिलने इंग्लंड मालिकेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.”
इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात आलेलया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत गिलने कर्णधार आणि फलंदाजी या दोन्हीसह चांगली कामगिरी केली आहे. कैफला असा विश्वास आहे की इंग्लंड मालिकेपूर्वी गिलला कर्णधारपद देण्याबाबत अनेक प्रश्न निर्माण केले जात होते. त्याने त्याच्या बॅट आणि नेतृत्वाने याचे सडेतोड उत्तर दिले आहे.