ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात संधी मिळणार? (फोटो- ट्विटर)
ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात एंट्री मिळणार
ट्राय सिरिजमध्ये ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी
आयपीएलमध्ये केलेले सीएसकेचे नेतृत्व
Team India: सध्या श्रीलंकेत ट्राय सिरिज सुरू आहे. भारत, श्रीलंका आणि अफघणिस्तान या तीन संघांमध्ये सामने सुरू आहेत. आपल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारत अ संघाने शानदार फलंदाजी केली आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये ऋतुराज गायकवाडने शानदार फलंदाजी केली आहे. पहिल्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या ऋतुराज गायकवाडने आजच्या सामन्यात देखील अपला फॉर्म कायम ठेवला आहे. शानदार अरधतशतकी खेळी त्याने केली आहे. एकीकडे ऋतुराज गायकवाड सातत्याने धावांचा पाऊस पाडत असताना, दुसरीकडे वरिष्ठ संघात मात्र त्याची एंट्री का होत नाहीये? यावर आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.
सोशल मिडियावर ऋतुराज गायकवाडबाबत चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेट वर्तुळात हा चर्चेचा विषय झाला आहे. ऋतुराज गायकवाडने मागच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध शानदार शतक ठोकले होते आणि आज पुन्हा ६६ धावांचे योगदान दिले. तरीही १३ जूनपासून सुरू होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मुख्य वनडे मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार झालेला नाही. आगामी काळात भारत इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्ध देखील अनेक सामने खेळणार आहे. त्यामध्ये देखील ऋतुराजचा विचार करण्यात आलेला नाही.
IND Vs SL: ऑगस्टमध्ये कसोटी मालिका; तब्बल 9 वर्षांनी भारत श्रीलंकेत जाणार? तारखा जाहीर?
ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व देखील करतो. त्यामुळे त्याचा विचार का करण्यात आला नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. ऋतुराज गायकवाडने 2022 मध्ये वनडे संघात पदार्पण केले होते. 2022 पासून 2025 पर्यन्त तो एकूण 9 सामने खेळला आहे. त्यात 228 रन्स केल्या आहेत. तर एक शतकी खेळी केली आहे. तर एक अर्धशतक लगावले आहे.
तब्बल 9 वर्षांनी भारत श्रीलंकेत जाणार?
पुढील काही महीने क्रिकेट चंहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे. भारतीय संघ अनेक संघांच्या विरुद्ध वनडे सिरिज आणि कसोटी सामने खेळणार आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समोर येत आहे. श्रीलंका आणि भारतीय संघ डब्ल्यूटीसी अंतर्गत दोन कसोटी सामने खेळणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘सरपंच’ इज बॅक! Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार ; इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले
पहिला कसोटी सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाण्याची शक्यता आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड किंवा बीसीसीआयने या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली नाहीये. तर दूसरा सामना 23 ऑगस्टपासून खेळला जाऊ शकतो. लवकरच या दौऱ्याची आणि त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे.






