बीसीसीआयने लागू केले नवे नियम (फोटो- istockphoto)
गोलंदाजांच्या चुकीच्या कृतीवर आणि नियमबाह्य प्रकारांवर कडक कारवाई केली जाणार आहे. बीसीसीआयने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये गोलंदाजांसाठी अत्यंत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. गोलंदाजांनी जाणीवपूर्वक नो बॉल टाकल्यास किंवा थेट फलंदाजांच्या मागे बॉल टाकल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
जाणीवपूर्वक फ्रंट फुट नो-बॉल गोलंदाजांनी टाकल्यास बीसीसीआयने कारवाईचा इशारा दिला आहे. अशी कृती केल्यास गोलंदाजाला संबंधित डावातून नव्हे तर संपूर्ण संन्यातून निलंबित केले जाणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि फिक्सिंग किंवा संशयास्पद प्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
बातमी अपडेट होत आहे…






