IND Vs ZIM pitch Report (फोटो- istockphoto)
भारत विरुद्ध झिम्बाब्वे पीच रिपोर्ट
आजचा सामना हरारे क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 4.30 वाजता होणार आहे. हे पीच कमी धावसंख्येसाठी ओळखले जाते. वनडे सिरिजमध्ये देखील या ठिकाणी 250 पेक्षा जास्त स्कोअर झाला नव्हता. या पीचवर नव्या बॉलने बॅटिंग करणे थोडेसे अवघड जाते. त्यामुळे या ठिकाणी कोणताही कर्णधार टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आज कर्णधार म्हणून पहिला टी सामना आणि ही सिरिज जिंकण्याचे आव्हान श्रेयस अय्यरसमोर असणार आहे. तसेच वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.
Abhishek Sharma: इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर अभिषेक शर्मा, 6000 पार करण्यासाठी 16 धावा दूर, 200 व्या सामन्यात करणार कारनामा
हरारे स्टेडियमचा रिपोर्ट
एकूण सामने 75
प्रथम फलंदाजी करताना विजय – 39
टार्गेटचा पाठलाग करताना विजय – 34
टॉस जिंकून विजय – 39
टॉस हरल्यावर विजय – 34
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत अन् झिम्बाब्वे यांच्यात आतापरीनात एकूण 14 सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने 11 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने झिम्बाब्वेच्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा झिम्बाब्वे संघावर दबदबा पाहायला मिळत आहे.
दोन्ही संघातून कोण खेळणार?
भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, यश ठाकूर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अशोक शर्मा, रवि बिश्नोई, प्रभसिमरन सिंह आणि रिंकू सिंह
झिम्बाब्वे संघ: सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, तनाका चिवांगा, बेन कुरन, ब्रॅड इव्हान्स, वेस्ली मधवेरे, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाबदझा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा, न्यूमन न्यामहुरी, मिल्टन तफा शुम्बा आणि शुम्बा.






