फोटो सौजन्य - सोशल मीडिया
संजू सॅमसन आणि अभिषेक नायर व्हिडीओ : टीम इंडियाला २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामान्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेचा शुभारंभ होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या मालिकेचा पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर या सामन्याची तयारी सुरू आहे. भारतीय संघाने नेटवर खूप घाम गाळला, पण संघ बाँडिंग सत्रादरम्यान भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षक गाताना दिसले. यावेळी T२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने याचा आनंद लुटला. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि प्रशिक्षक अभिषेक नायर यांचे गाणे पाहून सूर्याने सॅमसनच्या पोस्टवर मजेशीर कमेंट केली आहे आणि ती आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Pakistan Cricket : पाकिस्तान स्टार खेळाडू मोहम्मद अब्बासच्या घरी शोककळा; धाकट्या बहिणीचे अपघाती निधन
संजू सॅमसनने त्याच्या इंस्टाग्रामवर टीम बाँडिंग सत्रादरम्यान गातानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सॅमसन आणि अभिषेक नायर हे गाणे गात आहेत – हवाओं में कहीं… या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संजूने लिहिले, “काहीही अशक्य नाही. मी मुंबईला येऊ का?” याच पोस्टवर कमेंट करताना सूर्याने लिहिले की, “तू मुंबईला येत आहेस, पण चेन्नई, राजकोट आणि पुण्याच्या ऑडिशननंतर.”
टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव या शहरांच्या नावांचा उल्लेख का करत आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यानंतर या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईमध्ये खेळवला जाणार आहे, तर तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जाईल आणि त्यानंतर चौथा सामना पुण्यात होणार आहे. त्यानंतर मालिकेतील शेवटचा सामना मुंबईत होणार आहे. अशाप्रकारे तुम्हाला या शहरांमध्येही ऑडिशन द्यावी लागेल, असे कॅप्टन सूर्याने मजा करताना सांगितले आहे.
सूर्यकुमार यादवची कमेंट
जर तुम्ही भारतीय गायनाचे रिॲलिटी शो अजिबात फॉलो करत असाल, तर तुम्हाला कळेल की त्या शोमध्ये जज अनेकदा सांगतात की तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही…जेव्हा ऑडिशन्स इतर कोणत्याही शहरात होतात आणि कोणीही गायक चांगले गात नाही तुम्ही मुंबईला येऊ शकत नाही, असे सांगितले. सूर्यानेही असं काहीसं म्हटलं आहे.
भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध T२० मालिका झाल्यानंतर टीम सामान्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी भारताच्या संघाची कमान रोहित शर्माकडे असणार आहे. तर उपकर्णधार शुभमन गिल असणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामी देखील संघाचा भाग आहे. याआधी मोहम्मद शामी होण्याऱ्या इंग्लडविरुद्ध मालिकेमध्ये कशी कामगिरी करेल यावर तो प्लेइंग ११ मध्ये खेळणार की नाही हे पाहणं मनोरंजक ठरेल.