हैद्राबादच्या मैदानावर संजू सॅमसनची बॅट तळपली, टीम इंडियात स्थान होणार पक्के
Sanju Samson, Vijay Hazare Trophy : इंग्लंडविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. तथापि, एकदिवसीय मालिकेसाठी खेळाडूंची नावे अद्यापि जाहीर केलेली नाहीत. असे मानले जात आहे की BCCI लवकरच एकदिवसीय मालिकेसाठी बैठक घेऊ शकते, परंतु त्यापूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसाठी वाईट बातमी समोर येत आहे. आतापर्यंत संजू सॅमसनकडे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विकेटकीपर म्हणून पाहिले जात होते, पण आता या विकेटकीपर फलंदाजाच्या अडचणी वाढू शकतात. इंग्लंड मालिकेव्यतिरिक्त, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही वगळले जाऊ शकते.
संजू सॅमसनच्या या निर्णयाने BCCI खूप निराश
संजू सॅमसनने देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत भाग घेतला नाही. या निर्णयावर BCCI खूप नाराज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, BCCI संपूर्ण प्रकरणाची चौकशी करू इच्छिते. BCCIला आता टीम इंडियाच्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व द्यावे असे वाटते. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की संजू सॅमसनने केरळ क्रिकेट असोसिएशनला सांगितले होते की, तो विजय हजारे ट्रॉफीच्या तयारीसाठी कॅम्पमध्ये येऊ शकणार नाही. यानंतर, केसीएने त्याला स्पर्धेतून वगळले, ज्यामुळे वाद वाढला. खरंतर, संजू सॅमसन आणि केरळ क्रिकेट असोसिएशनमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे.
संजू सॅमसनकडे कोणते पर्याय
मीडिया रिपोर्ट्सनुसार, BCCI निवडकर्त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळण्यामागील खरे कारण संजू सॅमसनकडून जाणून घ्यायचे आहे. जर तो यात अपयशी ठरला तर आगामी एकदिवसीय सामन्यांसाठी अडचणी वाढतील. BCCI च्या सूत्रांनी सांगितले की, ‘सॅमसनचा केसीएसोबत दीर्घकाळापासून वाद आहे. पण यामुळे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेत नाही हे शक्य नाही. त्यांना गैरसमज दूर करावे लागतील आणि नंतर खेळावे लागेल. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या स्थानिक टी-२० स्पर्धेत भाग घेतला होता.
हेही वाचा : BCCI 10 Points Policy : काय आहे BCCI ची 10 पॉईंट पॉलिसी; लागू होणार सर्व खेळाडूंवर; वाचा नवीन नियमांची सूची