फोटो सौजन्य - Rohit Sharma X अकाउंट
रोहित शर्मा : इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये (Indian Premier League 2024) मुंबई इंडियन्सचा संघ वादामध्ये दिसला. मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदावरून अनेक वाद पाहायला मिळाले. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला पदावरून काढण्यात आले आणि हार्दिक पांड्याला कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये खेळाडूंमध्ये दूषित वातावरण पाहायला मिळाले. त्यानंतर आता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, भारताचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सला अलविदा करणार का? आयपीएल २०२४ सुरु असताना अशा चर्चा सुरु होत्या की आयपीएलच्या पुढील सीझनमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या कोणत्या तरी संघाकडून खेळताना दिसणार आहे. परंतु नक्की सत्य काय? यासंदर्भात सविस्तर वाचा.
जेव्हा हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असणार आहे अशी घोषणा केल्यानंतर चाहत्यांना ते अजिबात आवडले नव्हते. त्यानंतर अनेकांनी हार्दिक पांड्याला ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्याचबरोबर एक रोहित शर्माचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. तो या व्हिडीओमध्ये संघ बदलण्याची चर्चा करताना अभिषेक नायरसोबत दिसला होता. त्यामुळे आता असे अंदाज लावले जात होते की, आगामी आयपीएलमध्ये रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो. ‘दैनिक जागरण’च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते की, रोहित शर्मा आयपीएल २०२५ पूर्वी मुंबई इंडियन्सला अलविदा म्हणू शकतो.
आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्याला त्याच्या कर्णधार पदाच्या संदर्भात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या टीकांचा सामना करावा लागला होता तर मैदानामध्ये सुद्धा रोहित शर्माच्या चाहत्यांनी त्याला ट्रोलिंग करण्यापासून सोडले नाही. प्रत्येक ठिकाणी त्याला ट्रोल करण्यात आले होते. रोहित शर्माचे चाहते त्याला मैदानामध्ये रोहित शर्माच्या नावाने घोषणाबाजी करून देखील छेड काढत होते.