फोटो सौजन्य : Mumbai Cricket Association (MCA)/Social Media
T20 Mumbai League 2025 Final : श्रेयस अय्यर दुसऱ्यांदा पंधरा दिवसांमध्ये फायनल सामना खेळताना दिसणार आहे त्याने मागील काही महिन्यात कमालीची कामगिरी केली आहे. आयपीएल 2025 मध्ये त्याने पंजाब किंग च्या संघाला फायनलमध्ये नेले तर आत्ता त्याने सोबो मुंबई फाल्कोंस यांना देखील फायनलमध्ये पोहोचवले आहे. सेमी फायनलच्या सामन्यांमध्ये तो इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघामध्ये सामील झाला होता यावेळी अंगकृष रघुवंशी याने संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. मागील अनेक सीझनमध्ये त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली.
पंजाब किंग्सच्या संघाला फायनसलच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे श्रेयसचे या सामन्यात लक्ष हे ट्रॉफीवर असणार आहे. सोबो मुंबई फाल्कोंस विरुद्ध मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यामध्ये हा फायनान्स सामना खेळवला जाणार आहे. मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्या संघाचे कर्णधार पद हे सिद्धेश लाड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. हा सामना हा मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. या सामन्याच्या अर्ध्या तासाआधी ७ वाजता नाणे फेकणार होणार आहे.
कधी आणि कुठे पाहता येणार लाइव्ह स्ट्रिंमिग
T20 मुंबई लीग 2025 च्या या फायनल च्या सामन्यात जेतेपद कोण मिळणार याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. सोबो मुंबई फाल्कोंस विरुद्ध मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग ही जिओहाॅटस्टारवर पाहायला मिळणार आहे. तर हा सामना टेलिव्हीजनवर पाहणारे प्रेक्षक हे स्टार स्पोर्टवर पाहु शकतात.
𝐓𝐇𝐄 𝐅𝐈𝐍𝐀𝐋 𝐈𝐒 𝐇𝐄𝐑𝐄! 🏆
Who will rise as the champion of #T20Mumbai? 👀#MCA #BCCI #Cricket #Wankhede pic.twitter.com/0tYUO5mHMA
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) June 11, 2025
श्रेयस अय्यर याने कमालिची कामगिरी मागील काही वर्षामध्ये केली आहे, त्यामुळे त्याने भारतीय चाहत्यांचे लक्ष तर वेधले आहेच त्याचबरोबर त्याने बीसीसीआयच्या सिलेक्टरचे देखील लक्ष वेधले आहे. मागिल सिझनमध्ये त्याने त्याच्या कॅप्टन्सीमध्ये केकेआरला जेतेपद आयपीएलचे मिळवुन दिले होते तर यावर्षी त्याने पंजाब किंग्सच्या संघाला 11 वर्षानंतर फायनलमध्ये पोहोचवले, त्याने फक्त त्याच्या कॅप्टन्सीनेच नाही तर त्याने त्याच्या कामगिरीने देखील प्रभावित केले आहे.