फोटो सौजन्य - सोशल मीडिया
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सध्या श्रीलंकामध्ये सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. या दोन्ही संघामध्ये तीन सामान्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेचे दोन सामने आतापर्यत झाले आहेत. काल या मालिकेचा शेवटचा सामना झाला, या मालिकेचा पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये श्रीलंकेने न्यूझीलंड संघाला ३ विकेट्सने पराभूत केले आहे. या विजयासह श्रीलंकेच्या संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला होता त्यानंतर त्याच्याकडे १-० अशी आघाडी घेतली होती. श्रीलंकेने यावर्षी चांगली कामगिरी केली आहे आणि या मालिकेतही त्यांचा चांगला खेळ सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना श्रीलंकेने अतिशय रोमांचकारी पद्धतीने जिंकला होता.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा परिणाम दिसून आला. त्यामुळे सामना ४७-४७ षटकांचा खेळ खेळवण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजीकेली आणि 45.1 षटकात 209 धावांवर सर्वबाद झाला.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
आता श्रीलंकेला 47 षटकांत 210 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. त्याच्या संघाने 46 षटकांत म्हणजे एका षटकात 7 गडी गमावून 210 धावा केल्या आणि सामना सहज जिंकला. श्रीलंकेच्या विजयात कुशल मेंडिसची भूमिका महत्त्वाची होती. कुशल मेंडिसने संघासाठी ७४ धावांच्या शानदार खेळीमुळे श्रीलंकेने सामना जिंकला. एका टोकाकडून तो एकटाच धावा काढत होता. या खेळीसाठी तो मॅन ऑफ द मॅच म्हणूनही निवडला गेला. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर महेश तीक्ष्णनाने संघासाठी कमालीची कामगिरी केली. त्याने सामन्यात ९.१ ओव्हर टाकल्या आणि संघासाठी तीन विकेट्स घेतले. तर जेफ्री वँडरसेने सुद्धा संघासाठी तीन विकेट्सची कमाई करून संघासाठी महत्वाची कामगिरी केली.
2-0 lead and it is Sri Lanka’s first ODI series win over NZ since 2012 👏
It was an old-school ODI classic
🔗 https://t.co/35mQb7QYsH | #SLvNZ pic.twitter.com/dpJG5VOt1Y
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 17, 2024
श्रीलंकेचा संघ यावर्षी खूप चांगले क्रिकेट खेळला आहे. सर्वप्रथम त्यांनी घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 2-0 असा क्लीन स्वीप केला. यानंतर तो इंग्लंडला गेला आणि कसोटी सामना जिंकला. या सगळ्याशिवाय एकदिवसीय मालिकेतही श्रीलंकेने टीम इंडियाचा पराभव केला. आता श्रीलंकेचा संघ न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही चांगली कामगिरी करत आहे. हा तोच श्रीलंकेचा संघ आहे, ज्याबद्दल काही महिन्यांपूर्वी त्यांच्या संघात चांगले काहीच उरले नसल्याचे बोलले जात होते, पण सनथ जयसूर्या यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याने श्रीलंकेच्या संघाला एक नवी संजीवनी मिळाली आहे. . तो आपल्या चांगल्या खेळाने चाहत्यांना सतत प्रभावित करत आहे.