फोटो सौजन्य - Proteas Men सोशल मीडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यातील पराभवानंतरही पाकिस्तानने मालिका २-० अशी गमावली आहे. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी एका खेळाडूच्या फलंदाजीची सर्वाधिक चर्चा होत आहे. शान मसूद असे या खेळाडूचे नाव आहे. पाकिस्तानच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या खराब कामगिरीनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी दमदार सुरुवात करून पहिल्या विकेटसाठी २०५ धावांची खेळी खेळली.
फॉलोऑननंतर पुन्हा फलंदाजीला आल्यावर कर्णधार शान मसूदने पाकिस्तानी संघाला डावाच्या पराभवापासून वाचवण्याची कमान सांभाळली. यादरम्यान त्याने १४५ धावांची संस्मरणीय खेळी खेळली. त्याच्या या खेळीमुळे पाकिस्तानला डावाचा पराभव टाळण्यात यश आले. यादरम्यान त्याने जवळपास २७ वर्षे जुना रेकॉर्ड नष्ट केला.
End of a fine knock from the 🇵🇰 captain!@shani_official scores a magnificent 145 off 251 balls 👏#SAvPAK pic.twitter.com/tQP7uVWM5p
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 6, 2025
दुसऱ्या डावात त्याने १४५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेतील कोणत्याही पाकिस्तानी फलंदाजाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या आहे. पाकिस्तानच्या अझहर महमूदने १९९८ मध्ये १३६ धावांची इनिंग खेळली होती. त्याच्याशिवाय तौफिक उमरने १३५ धावा केल्या होत्या. तर सईद अन्वरने दक्षिण आफ्रिकेत ११८ धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर आता शान मसूद दक्षिण आफ्रिकेत सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे.
Yuzvendra Chahal : घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान युजवेंद्र चहलसोबत मिस्ट्री गर्ल कोण? व्हिडीओ व्हायरल
केपटाऊन कसोटीत १० गडी राखून दणदणीत विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेने २ सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा क्लीन स्वीप केला. दक्षिण आफ्रिकेने ६ महिन्यांत सलग ७ कसोटी जिंकून १२ वर्षे जुना विक्रम मोडला. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दुसऱ्यांदा १० विकेट्सने पराभव केला. पहिल्या डावात १९४ धावांत सर्वबाद झाल्यानंतर पाकिस्तानने फॉलोऑन खेळून ४७८ धावा केल्या. फॉलोऑननंतर सामना गमावताना ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. सर्वाधिक धावसंख्या भारताच्या नावावर आहे. टेंबा बावुमा कर्णधार झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ९ पैकी ८ कसोटी जिंकल्या आहेत.
South Africa win the second Test by 10 wickets after Pakistan’s fightback in their second innings.#SAvPAK pic.twitter.com/KDetBq7bT1
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 6, 2025
दक्षिण आफ्रिकेने ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ किंवा सहा महिन्यांपर्यंत सलग ७ विजय मिळवले आहेत. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने नोव्हेंबर २०१२ ते फेब्रुवारी २०१३ किंवा ४ महिने सलग ६ कसोटी जिंकल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या केपटाऊन कसोटीतील विजयानंतर हा विक्रम मोडला गेला. दक्षिण आफ्रिकेने मार्च २००२ ते ऑगस्ट २००३ या १७ महिन्यांत सलग ९ सामने जिंकले होते.