फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये T20 मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भारताच्या संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. भारताचा संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चार सामान्यांची T20 मालिका खेळवली जाणार आहे. यात टीम इंडियाने अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. पहिला सामना ८ नोव्हेंबरला होणार आहे तर दुसरा सामन्याचे आयोजन १० नोव्हेंबरला करण्यात आले आहे. तिसऱ्या सामन्याचे १३ नोव्हेंबरला आयोजन करण्यात आले आहे तर चौथा आणि शेवटचा सामना १५ नोव्हेंबरला रंगणार आहे. आता या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा महत्वाचा गोलंदाजाला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – IPL Retention 2025 : आयपीएल २०२५ च्या रिटेन्शनमध्ये या खेळाडूंना बसणार धक्का! वाचा संपूर्ण यादी
दक्षिण आफ्रिका संघाचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला या मालिकेत स्थान मिळाले नाही. चार सामन्यांच्या T20 मालिकेसाठी एडन मार्करामकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. या T20 मालिकेसाठी टीम इंडियाने यापूर्वीच संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव दिसणार आहे. T20 विश्वचषक 2024 पासून, सूर्या टीम इंडियाचा कायमस्वरूपी T20 कर्णधार म्हणून दिसला.
सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ बांग्लादेश दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 02 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. रबाडा या कसोटी मालिकेचा एक भाग असून तो उत्कृष्ट गोलंदाजी दाखवत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी क्रमवारीत रबाडा कसोटीतील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे. मात्र T20 मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला नाही.
हेदेखील वाचा – मुंबईच्या कसोटी सामन्यातून जसप्रीत बुमराह असणार बाहेर; काय आहे नेमकं कारण; जाणून घ्या सविस्तर
एडेन मार्कराम बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही आफ्रिकेचे नेतृत्व करत असून त्याला टी-२० मालिकेसाठी आफ्रिकेचा कर्णधारही बनवण्यात आले आहे. याशिवाय हेनरिक क्लासेन, केशव महाराज आणि डेव्हिड मिलर असे काही जुने आणि अनुभवी खेळाडूही संघात दिसले.
भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिकेनंतर भारताचा संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२०२५ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. या स्पर्धेची सुरुवात २२ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. टीम इंडियासाठी मोठे आव्हान असणार आहे.
एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मॅपोंगवाना, नकाबा पीटर, रायन रिकेल्टन, अँडिले स्टेबलेन, ट्राय स्टेबलेन.