फोटो सौजन्य – X
ऑस्ट्रेलियाच्या संघाला 2025 मध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या सामन्यात निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये दोन बदल करण्यात आले होते. मार्गस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ या दोघांना वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या मालिकेमध्ये वगळण्यात आले होते. शुक्रवारी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा १५९ धावांनी पराभव केला. सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजच्या संघाने चांगली कामगिरी केली, ऑस्ट्रेलियाला जोरदार टक्कर दिली पण दुसऱ्या डावाच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे वेस्ट इंडिज संघाला सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेनशिवाय खेळला.
स्मिथला दुखापत झाली होती, तर लाबुशेन खराब फॉर्ममुळे संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने म्हटले आहे की स्मिथ त्याची तंदुरुस्ती परत मिळवण्यासाठी काम करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना स्टीव्ह स्मिथला दुखापत झाली. टेम्बा बावुनाचा झटपट झेल घेण्याचा प्रयत्न करताना स्मिथला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने खुलासा केला की स्मिथ न्यू यॉर्कमध्ये फलंदाजीच्या सरावात परतला आहे. ३ जुलैपासून ग्रेनाडा येथे होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी त्याला त्याची फिटनेस सिद्ध करून आपला दावा मजबूत करायचा आहे.
AUS vs WI : WTC पॉईंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात! वेस्ट इंडीजला 159 धावांनी केलं पराभुत
पुढे तो म्हणाला की, “त्याने न्यू यॉर्कमध्ये काही षटके टाकली आहेत, मला वाटते की तो टेनिस बॉलने टाकला होता आणि तो एक उत्तम चेंडू आहे. मला वाटते की त्याची दुखापत बरी होत आहे, म्हणून पुढचा टप्पा म्हणजे येथे येऊन नेटमध्ये काही चेंडू खेळणे आणि सराव करणे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आपल्याला त्याबद्दल कळेल,” असे कमिन्स म्हणाला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला स्मिथची उणीव भासली. पहिल्या डावात संघाने २२ धावांवर तीन विकेट्स गमावल्या आणि दुसऱ्या डावात ६५ धावांवर चार विकेट्स गमावल्या. २०१८ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेन आणि स्मिथशिवाय खेळले खराब फॉर्ममुळे लाबुशेनला संघातून वगळावे लागले. त्याच्या जागी सॅम कोटासला संधी मिळाली आहे. तथापि, तो संधीचा फायदा घेऊ शकला नाही आणि पहिल्या डावात तो फक्त तीन आणि दुसऱ्या डावात पाच धावा करू शकला. त्याला शमार जोसेफने बाद केले. जोश इंग्लिशने सामन्यात १७ धावा केल्या.