फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Suryakumar Yadav completes 100 matches : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एकाना स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या या सामन्यांमध्ये मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने विजय मिळवून आयपीएल २०२५ चा पहिला विजय नावावर केला होता. या सामन्यांमध्ये भारताचा t20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने कमालची फलंदाजी केली होती त्याचबरोबर गुजरातविरुद्ध देखील ४८ धावांची खेळी खेळली होती.
तर आज त्याच्यासाठी आयपीएलच्या इतिहासातला खास दिवस आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा आज आयपीएल २०२५ मध्ये तो १०० वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे. आज सूर्यकुमार यादव याचा १०० वा सामना असल्यामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या सोशल मीडियावर खास फोटो शेअर करून त्याला सन्मानित करण्यात आले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये सूर्यकुमार यादवला मुंबई इंडियन्सचे कोच कायरान पोलार्ड हा त्याला शंभर नंबरचे टी-शर्ट देत आहे. कालच्या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स चा फलंदाज रिंकू सिंग याचे ५० सामने पूर्ण झाल्यामुळे त्याला पन्नास नंबरचे टी-शर्ट देऊन सन्मानित करण्यात आले होते.
𝗦𝗸𝘆-𝗛𝗶𝗴𝗵 𝗕𝗿𝗶𝗹𝗹𝗶𝗮𝗻𝗰𝗲 🫡
Surya Kumar Yadav marks a special century as he steps into his 1️⃣0️⃣0️⃣th #TATAIPL match for @mipaltan 💙
Can he make his night more memorable? #LSGvMI | @surya_14kumar pic.twitter.com/VgiZYHcx6z
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2025
हार्दिकला गुजरात टायटन्सविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाली, पण तो काही खास कामगिरी करू शकला नाही. अशा परिस्थितीत, हार्दिकला लखनौविरुद्ध फलंदाजीने नक्कीच धमाल करायची असेल. मुंबईच्या दृष्टिकोनातूनही, हार्दिकने या हंगामात फलंदाजी आणि चेंडू दोन्हीत चांगली कामगिरी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ मध्ये पहिला विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अमेयने ८ विकेट घेतल्या. संघाच्या गोलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती. २३ वर्षीय युवा गोलंदाज अश्विनी कुमारने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच आपली छाप पाडण्यात यश मिळवले आणि ४ विकेट्स घेतल्या. फलंदाजीत, रायन रिकेल्टनने ४१ चेंडूत ६२ धावांची शानदार खेळी केली, तर सूर्यकुमारने ९ चेंडूत २७ धावा केल्या.