भारत वि पाक(फोटो-सोशल मीडिया)
India will leave Pakistan behind : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी विजय मिळवून मालकीत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता भारताचे लक्ष्य हे दूसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेणे हे असणार आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असा पराक्रम रचला जाईल, जो आतापर्यंत कोणत्याही संघाला करता आलेला नाही.
हेही वाचा : ‘मी रिस्क घेईन, तू खेळत रहा…” स्वत:चे करियर धोक्यात घालणाऱ्या रोहित शर्माबद्दल यशस्वी जयस्वालचा मोठा खुलासा
भारतीय संघाने आतापर्यंत तीन संघांविरुद्ध १५+ द्विपक्षीय टी-२० सामन्यात विजय मिळवले आहेत. पाकिस्तान आणि भारत सध्या संघांविरुद्ध द्विपक्षीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमात बरोबरीत आहेत. ज्यामध्ये १५ किंवा त्याहून अधिक विजयाचा समावेश आहे. भारताने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध ही किमया साधली आहे.
पाकिस्तानने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध ही कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४ द्विपक्षीय टी-२० सामने जिंकले असून एक विजय मिळवल्यास भारत १५ किंवा त्याहून अधिक विजय मिळवणाऱ्या संघांविरुद्ध द्विपक्षीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा संघ ठरणार आहे.
शुभमन गिल सध्या फॉर्ममदये नसल्याचे दिसत आहे. तो आपला सहकारी अभिषेक शर्माइतका पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करताना दिसत नसल्याने या सामन्यात सर्वांच्या नजर असणार आहेत. शुभमन गिल व्यतिरिक्त, कर्णधार सूर्यकुमार यादवची कामगिरी देखील निराशाजनक अशीच आहे. त्यामुळे त्याला देखील आपली कामगिरी उंचवावी लागेल.
हेही वाचा : IND vs SA 2nd T20 : दुसऱ्या टी20 सामन्यावर पावसाचे सावट? मुल्लानपूरमध्ये कसे असणार हवामान? जाणून घ्या
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, संजू संजू.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, ॲनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, रीझा बॉड्रिक, रीझा बॉर्डेन, बोरसेन, बोरसेन.






