फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मीडिया
आयसीसी महिला अंडर-१९ T२० विश्वचषक २०२५ सेमीफायनल – भारत विरुद्ध इंग्लंड : आयसीसी महिला अंडर-१९ T२० विश्वचषक २०२५ चा दुसरा सेमीफायनलचा सामना सुरु झाला आहे. यामध्ये इंग्लंडची कर्णधार अबिगेल नॉरग्रोव्ह हिने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या उभारेल अशा अंदाज लावला जात होता. पण आहे टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी खेळ बदलला आहे. भारताच्या संघाने गोलंदाजीची आव्हान स्वीकारत फिरकी गोलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे. टीम इंडियासमोर इंग्लंडच्या संघाने ११४ धावांचे लक्ष्य उभे केले आहे.
भारताच्या संघाच्या हाती पहिला विकेट ५व्या ओव्हरमध्ये गेला. जेमिमा स्पेन्स ही संघासाठी ९ धावा करून बाद झाली. त्यानंतर दुसरा विकेट्स ट्रुडी जॉन्सन हीच गेला, तिसऱ्या विकेटसाठी इंग्लंडच्या फलंदाजांनी ४४ धावांची मोठी भागीदारी केली. त्यामुळे आता सेट फलंदाज इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी होईल असे वाटत होते. डेविना पेरिन हीच १२ व्या ओव्हरमध्ये विकेट हाती लागला. तिने संघासाठी सर्वात मोठी खेळी ४५ धावांची केली.
WHAT A TURNAROUND FROM INDIA! 🇮🇳 England went from 79/2 (11) to 92/8 (16) as the Indian spinners ran riot, yet again! 🔥#U19WorldCup pic.twitter.com/FopJS895oG — Women’s CricZone (@WomensCricZone) January 31, 2025
त्यानंतर इंग्लंच्या फलंदाजाच्या विकेटच्या रांगा लागल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांची आयुषी शुक्ला हिने २ विकेट्स घेतले. आयुषीने इंग्लंडची कर्णधार अबिगेल नॉरग्रोव्ह आणि डेविना पेरिन या दोन महत्वाची फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. पारुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्मा या दोघांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतले. पारुनिका सिसोदिया हिने यष्टीरक्षक केटी जोन्स, ट्रुडी जॉन्सन आणि जेमिमा स्पेन्स यांना बाहेरचा रस्ता दाखवला. तर वैष्णवी शर्माने शार्लोट स्टब्स, शार्लोट लॅम्बर्ट आणि प्रिशा ठाणावाला या पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
इंग्लंच्या संघाने ११.५ ओव्हरमध्ये फक्त ३ विकेट्स गमावले होते. त्यानंतर ११.५ ते १६ ओव्हरमध्ये टीम इंडियाच्या हाती ५ विकेट्स लागले आणि इंग्लंडची धावसंख्या संथ झाली.
भारताच्या संघाने या स्पर्धेमध्ये अविश्वनीय कामगिरी केली आहे. भारताच्या संघाने एकही सामना न गमावता सेमीफायनल गाठली आहे. मागील सामन्यांमध्ये त्रिशा गोंगाडीने शतक ठोकून इतिहास रचला होता. त्याचबरोबर भारताच्या संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये एकतर्फी सामना जिंकला आहे. आयसीसी महिला अंडर-१९ T२० विश्वचषक २०२५ च्या पहिल्या सेमीफायनल सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आजच्या या दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यांमध्ये जो संघ विजयी होईल त्याची लढत दक्षिण आफ्रिकेशी फायनलच्या सामन्यांमध्ये होणार आहे.